अविवाहित साक्षी तन्वर बनली ‘आई’

अविवाहित साक्षी तन्वर बनली ‘आई’

अभिनेत्री साक्षी तन्वर मुगली दित्यासोबत (सौ.-ट्वीटर)

‘बडे अच्छे लगते है’ आणि ‘दंगल’ फेम अभिनेत्री साक्षी तन्वर सध्या भलतीच खूष आहे. ४५ वर्षीय साक्षी नुकतीच ‘आई’ बनल्यामुळे तिचे घरामध्ये आणि मित्रपरिवरामध्ये आनंदाचे वातावरण आहे. अविवाहित असलेल्या साक्षी तन्वरने आपली ‘आई’ बनण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ८ महिन्याच्या मुलीला दत्तक घेतले आहे. प्रिया आणि आणि तिच्या या गोडंस मुलीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुलगी दत्तक घेण्याच्या तिच्या या निर्णयाचं टीव्ही जगतातून कौतुक होत आहे. साक्षी तन्वरच्या ट्वीटर अकाउंटवरुन साक्षीचा तिच्या मुलीसोबतचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोला साक्षीच्या चाहत्यांकडून भरभरुन पसंती मिळते आहे. याशिवाय साक्षीचा भाऊ राजीव सिंग तन्वर यानेही एक फॅमिली फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘कुटुंबाची सर्वात छोटी मेंबर दित्या सिंग तन्वरचे स्वागत’, असा संदेश लिहीत त्याने साक्षीने मुलगी दत्तक घेतल्याचं अधिकृतरित्या जाहीर केले आहे.

अभिनेत्री साक्षी तन्वर मुगली दित्यासोबत (सौ.-ट्वीटर)

एकता कपूरने केला कौतुकाचा वर्षाव

साक्षीची सर्वात जवळची मैत्रिण एकता कपूर हिने तिचं खास शब्दांमध्ये कौतुक केलं आहे. ‘बड़े अच्छे लगते हैं…ये साक्षी, ये प्रिया, ये पार्वती और (दित्या) मॉम. तुझा आणि खुबसूरत प्रिन्सेसचा प्रवास खूबसुरत होवो’ अशाप्रकारचा संदेश लिहीत एकताने साक्षीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टवरुनही साक्षीने आपल्या मुलीचं नाव ‘दित्या’ ठेवल्याचं स्पष्ट होत आहे. साक्षी तन्वरने आजवर एकता कपूरच्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
First Published on: October 22, 2018 8:30 PM
Exit mobile version