Video: असा साकारला ‘झिरो’तील बुटका शाहरुख

Video: असा साकारला ‘झिरो’तील बुटका शाहरुख
शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘झिरो’ हा चित्रपट बॉस्क ऑफिसवर चांगलाच आपटला. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची जितकी हवा करण्यात आली होती, तितका प्रत्यक्षात मात्र हा फोटो सुपरफ्लॉप ठरला. तिनही सुपरस्टार्सच्या चाहत्यांची चित्रपट पाहिल्यानंतर घोर निराशा झाली. मात्र, ‘झिरो’मध्ये शाहरुखने साकारलेली ‘बऊआ’ची भूमिका चांगलाच भाव खाऊन गेली. शाहरुखने साकारलेला बुटका ‘बऊआ’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. याआधी शाहरुखने त्याच्या ‘फॅन’ या चित्रपटात साकारलेल्या विक्षीप्त गौरवचं पात्रं आणि त्या पात्राचा गेटअप, मेकअपही चर्चेचा विषय ठरला होता. त्याचप्रमाणे SRK ने झिरोमध्ये साकारलेल्या बुटक्या ‘बऊआ’ची सध्या सर्वत्र चर्चा होते आहे. मुळात बुटका नसलेल्या शाहरुख खानने बुटका बऊआ कसा साकारला असेल? याची उत्सुकता तमाम प्रेक्षकांना होती. VFX सारख्या जबरदस्त तंत्रज्ञानाचा यामध्ये खूप मोठा वाटा असला तरी, शाहरुखने ते पात्र पडद्यावर कसं जिवंत केलं असेल? याविषयी लोकांच्या मनात कुतुहूल होतं.
मात्र, प्रेक्षकांच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मिळाली आहेत. बऊच्या ‘मेकिंग’चा एक व्हिडिओ युट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. झिरो चित्रपटाची निर्माती कंपनी असलेल्या ‘रेड चिलीज’नेच हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असून, लोकांची त्याला भरभरुन पसंती मिळते आहे.

‘झिरो’चा प्रभाव झिरोच

सहसा शाहरुखचा चित्रपट हा त्याच्या फॅन्ससाठी पर्वणी असते. पण त्याचे गेल्या काही वर्षांपपासून फ्लॉप सिनेमेच येत आहेत. आता बोनासिंग म्हणजेच बुटक्या माणसासची भूमिका केलेला झिरो हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. पण शुक्रवारी रिलीजचा दिवस सोडता या सिनेमाने म्हणावी तशी कामगिरी केलेली नाही. या सिनेमाचे बजेट २०० कोटी होते. चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने २० कोटी ७१ लाखांचा गल्ला जमवला पण पहिल्या दिवशी जसा प्रतिसाद सिनेमाला मिळालेला तसा दुसऱ्या दिवशी मिळाला नाही. झिरोच्या आधी आलेला फॅन हा चित्रपटदेखील प्रेक्षकांना आवडला नव्हता. या सिनेमातील जबरा फॅन हे गाण सोडलं तर या चित्रपटात पाहण्यासारखं असं काहीच नव्हत. त्यामुळे शाहरुखचे प्रयोग त्याच्या फॅन्सनी आवडत नाहीत असचं काहीस वाटत आहे.

First Published on: December 28, 2018 4:32 PM
Exit mobile version