विरुष्काच्या ‘या’ फोटोवर होत आहेत मजेदार मिम्स व्हायरल

विरुष्काच्या ‘या’ फोटोवर होत आहेत मजेदार मिम्स व्हायरल

विराट कोहलीने नुकताच अनुष्का शर्मा सोबतचा आपला फोटो त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला. या शेअर केलेल्या फोटोला चाहत्यांनी खूप पसंती देखील दिली. तसेच विरुष्काचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून धुमाकूळ घालताना दिसतोय. हे दोघे समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करताना दिसत आहे. या फोटोला अनेकांना चांगल्या कमेंट दिल्या तर याच फोटोवर काहींनी मजेदार मिम्स तयार करून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

विराट कोहलीने बुधवारी अनुष्का सोबत इंस्टाग्रामवर अनुष्का सोबत समुद्र किनाऱ्यावर रिलॅक्स मूडमध्ये असताना फोटो शेअऱ केला. या फोटोमध्ये दोघांचे असणारे एक्सप्रेशन त्याच्यात असणाऱ्या बाँडिंगमुळे सगळ्याच चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसले. या शेअर केलेल्या फोटोला साधारण एका तासात लाखो लाईक मिळाल्या आहेत. हाच फोटो नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल करत त्यांचे मिम्स देखील व्हायरल केले आहेत.

First Published on: September 13, 2019 11:35 AM
Exit mobile version