‘विश्वरुपम २’ चा ट्रेलर आला

‘विश्वरुपम २’ चा ट्रेलर आला

विश्वरुपम २ मधील कमल हसनचा लूक

कमल हसनचा मोस्ट अवेटेड ‘विश्वरुपम २’ चा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. पहिला भाग हिट झाल्यानंतर हा सिनेमा कधी येणार ही उत्सुकता कमल हसनच्या चाहत्यांना होती. अखेर या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी या ट्रेलरला भरभरुन प्रतिसाद दिला आहे. अॅक्शन, ड्रामाने भरलेला असा ‘विश्वरुपम २’ चा ट्रेलर असून हा सिनेमा तामिळ, हिंदीमध्ये रिलीज होणार आहे.

असा आहे ट्रेलर

कमल हसनचा सिनेमा म्हणजे अॅक्शनचा भडिमार असणार यात काही शंका नाही. अगदी तसाच आहे विश्वरुपम २ चा ट्रेलर. पहिल्या भागापेक्षा या भागाच्या ट्रेलरमध्ये अधिक अॅक्शन सिक्वल बघायला मिळत आहे. अभिनेता राहुल बोस यात दहशतवादी असून त्याची भूमिका या भागात अधिक उठावदार दिसत आहे. हा सिनेमा पहिल्या सिनेमापेक्षा अधिक चांगला असेल, अशी आशा कमल हसनने ट्रेलर लाँचवेळी व्यक्त केली.

आमीरनं दिल्या शुभेच्छा

कमल हसनचा ‘विश्वरुपम २’ हा सिनेमा मोस्ट अवटेड होता. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेक टॉलीवूड सेलिब्रिटीजनी कमल हसन आणि विश्वरुपम २ च्या सिनेमाला शुभेच्छा दिल्या.  मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्याया हस्ते हिंदी  सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आले. आमीरने स्वत: या सिनेमाचा ट्रेलर ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

विश्वरुपम झाला होता हिट

अॅक्शन, ड्रामाने भरलेला कमल हसनचा विश्वरुपम २०१३ साली रिलीज झाला होता. हा सिनेमा सुपरडुपर हिट होता. देशभक्तीवर आधारीत असा हा सिनेमा अनेक अॅक्शन सिक्वलनी भरलेला होता. त्यामुळे पहिला विश्वरुपमला भरभरुन प्रतिसाद मिळाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती

धडकमुळे मिळाला कमी प्रतिसाद?

सैराटचा हिंदी रिमेक असलेला धडक सिनेमाचा ट्रेलर आणि विश्वरुपम २ चा ट्रेलर एकाच दिवशी लाँच करण्यात आला. दुपारी धडकच्या ट्रेलर लाँचचा बोलबाला होता. तर संध्याकाळी विश्वरुपम २ चा ट्रेलर लाँच झाला. दोन वेगळ्या धाटणीचे आणि मोस्ट अवेटेड असे हे दोन्ही सिनेमे होते. धडक हा जान्हवी कपूरचा पहिलावहिला सिनेमा आणि मराठी सैराटची रिमेक असल्यामुळे या सिनेमाला साहजिकच अधिक प्रतिसाद मिळाला. पण त्यामुळे विश्वरुपम २ कडे दुर्लक्ष झाले का? अशी चर्चा होत आहे.

 

First Published on: June 13, 2018 5:27 AM
Exit mobile version