सलमान खानच्या ‘भारत’साठी नव्या वाघा बॉर्डरची निर्मिती

सलमान खानच्या ‘भारत’साठी नव्या वाघा बॉर्डरची निर्मिती

सलमान आणि कतरिना

सलमान खान सध्या ‘भारत’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. पंजाबच्या अमृतसरमधील भारत – पाकिस्तान सीमेवरील अटारी – वाघा बॉर्डर ही जगप्रसिद्ध आहे. पण आता ही अटारी – वाघा बॉर्डर हुबेहूब दुसरी पण आहे म्हटलं तर. घाबरू नका. सलमानच्या चित्रपटासाठी ही अटारी – वाघा बॉर्डर लुधियाणापासून २० किलोमीटर अंतरावर हुबेहूब तयार करण्यात आली असून चित्रपटासाठी याचा सेट बनवण्यात आला आहे. संपूर्ण टीम या ठिकाणी आठ दिवस चित्रपटाचं चित्रीकरण करणार आहे.

लुधियाणातील बल्लोवाल गावात सेट

लुधियाणाधील पखोवाल रोडवरील स्थित असलेल्या बल्लोवाल गावामध्ये अटारी – वाघा बॉर्डरचा पूर्ण सेट तयार करण्यात आला आहे. भारत – पाकिस्तानच्या फाळणीच्या चित्रीकरणासाठी हा सेट तयार करण्यात आल्याची सध्या माहिती मिळत आहे. भारत आणि पाकिस्तानच्या युनिफॉर्ममध्ये जवानांनासुद्धा या चित्रीकरणामध्ये तैनात करण्यात आलं आहे. या चित्रपटामध्ये भारताच्या ७० वर्षाच्या इतिहासाबद्दल कथा दर्शवण्यात येत आहे. दरम्यान याठिकाणी सलमान खान, कतरिना कैफ आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांसह अन्य कलाकारही सध्या काम करत आहेत. या गावामध्ये बॉलीवूडमधील स्टार्स असल्यामुळे गावामध्ये वेगळाच उत्साह आला असून पंजाबमधील अनेक भागांमधून लोक येऊन सध्या चित्रीकरण बघत आहेत. शिवाय या गावातील लोकांचंही चित्रीकरण करण्यात येत आहे. मात्र चित्रीकरणामध्ये बाधा न येण्यासाठी पूर्ण गाव सध्या सील करण्यात आल्याची माहितीही मिळत आहे.

सलमान आणि कतरिना पुन्हा एकत्र

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि कतरिना कैफ ही जोडी नेहमीच पडद्यावर प्रेक्षकांना आवडली आहे. ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपटही तुफान गाजला होता. आता पुन्हा एकदा ही जोडी ‘भारत’मधून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनही अली अब्बास जाफर करत असून तिघेही तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. नुकतंच या चित्रपटाचं माल्टामध्ये चित्रीकरण झालं असून याआधी हा चित्रपट प्रियांका चोप्रा करणार होती. मात्र आता प्रियांकाने नकार दिल्यानंतर कतरिना हा चित्रपट करत आहे. याशिवाय दिशा पटानीदेखील या चित्रपटात पहिल्यांदाच सलमानबरोबर दिसणार आहे.

First Published on: November 13, 2018 8:46 PM
Exit mobile version