वॉच अ‍ॅण्ड प्ले

वॉच अ‍ॅण्ड प्ले

watch and play games

हल्लीची मुलं फार हुशार झाली आहेत, हे वाक्य आपल्याला काही नवीन नाही. ते खरंही आहे. बाजारात जी काही नवीन वस्तू येते ती सर्वप्रथम हाताळण्यात हीच मुलं सराईत असतात. अभ्यासाची पुस्तकं बाळगताना मोबाईलही हातात असायला हवा असे या मुलांना वाटते. कारण एकाग्रता करू शकतील, आपले बुद्धीचातुर्य दाखवू शकतील असे गेम, कार्टून कार्यक्रम बटन दाबताच त्यांना पहाता येतात. त्यामुळे काय झाले, ही मुलं टीव्ही जेवढा आवडीने पहातात, तेवढेच मोबाईलमधल्या गेममध्येही रमतात. छोट्यांसाठी ज्या वाहिन्या उपलब्ध आहेत, त्यात कार्टून नेटवर्क ही वाहिनी बच्चे कंपनीमध्ये लोकप्रिय आहे. बालप्रेक्षकांच्या गरजेप्रमाणे आपणही बदलायला हवे हा एकच हेतू ठेवून या चॅनलने ‘वॉच अ‍ॅण्ड प्ले’ हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे.

आय ओ एस या अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल उपकरणावर नवीन खेळ उपलब्ध केलेले आहेत. यामुळे लहान मुले ही अधिक आनंदी, खेळकर आणि उत्साही होणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर यातील काही गोष्टी उपलब्ध केल्या आणि त्याला पालकांबरोबर बालप्रेक्षकांचाही प्रतिसाद लाभला त्यामुळे कार्टून नेटवर्क वॉच अ‍ॅण्ड प्ले यांनी मनोरंजक खेळांची यादी आणखीन वाढवलेली आहे. यात मुलांच्या सुरक्षिततेचा, आरोग्याचाही विचार झालेला आहे. एकाच ठिकाणी सर्वप्रकारचे खेळ खेळता यावेत याची सुविधा यात केलेली आहे. प्रेक्षकप्रिय कार्टून यात सहभागी होतात. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार खेळाचा आनंद घ्यावा ही त्यापाठीमागची संकल्पना आहे. हिंदी, मराठी भाषेत ती उपलब्ध असल्यामुळे तोही आनंद मुलांसाठी वेगळाच असणार आहे. विनोद, साहस, अ‍ॅक्शन अशा बर्‍याच गोष्टींचा अनुभव मुलांना घेता येईल.

First Published on: February 14, 2019 5:13 AM
Exit mobile version