Drive In Cinema: थेएटर्स बंद तरीही मोठ्या स्क्रीनवर घेता येणार चित्रपटांचा आनंद!

Drive In Cinema: थेएटर्स बंद तरीही मोठ्या स्क्रीनवर घेता येणार चित्रपटांचा आनंद!

ड्राईव्ह इन थेएटर्स

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता हळूहळू सगळं पूर्ववत होत असलं तरी अद्याप थिएटर्स आणि सिनेमा हॉल बंद आहेत. आता थिएटर्स कधी सुरू होईल माहित नाही पण यावर उपाय म्हणून एनसीआर भागात ‘ड्राईव्ह इन सिनेमा’चा पर्याय सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना टीव्ही आणि लोकांना चित्रपट मोठ्या स्क्रीनवरही पाहता येणार आहेत.

‘ड्राईव्ह इन सिनेमा’ मध्ये सोशल डिस्टिस्निंग योग्य प्रमाणावर पाळले जाते. कारण लोक आपल्या गाडीतच बसून मोठ्या स्क्रीनवर चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. १९७० च्या दशकात अहमदाबाद आणि मुंबईत ड्राईव्ह इन सिनेमा सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, हा प्रयत्न फसला. सध्या भारतात सहा ड्राईव्ह इन सिनेमा आहेत. यापैंकी दोन गुरुग्राममध्ये आहेत.

रविवारी पार पडला ‘ड्राईव्ह इन सिनेमा’

गेल्या रविवारी एनसीआरमध्ये पाच महिन्यांत पहिल्यांदाच मुव्ही स्क्रीनिंग या पध्दतीनं करण्यात आली. आपापल्या गाडीत बसमाऱ्या लोकांनी मास्कसहीत सोशल डिस्टन्सिंगचही पालन केलं. हा सिनेमा पाहण्यासाठी जवळपास ३० गाड्या दाखल झाल्या होत्या. हा व्हिडिओ ३० फूट लांब स्क्रीनवर दिसतो तर ऑडिओ थेट कारमध्ये येतो.

२२ आणि २३ ऑगस्टला पुन्हा एकदा ड्राईव्ह इन सिनेमा दाखवण्यात येणार आहे. यासाठी एका शोचं तिकीट साधारणत: १२०० रुपये आहे. २२ ऑगस्ट रोजी ‘ला ला लँड’ आणि २३ ऑगस्ट रोजी ‘जब वी मेट’ सिनेमा दाखवण्यात येणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता हा सिनेमा सुरू होईल.

First Published on: August 19, 2020 12:23 PM
Exit mobile version