यंदा चित्रपटांना आव्हान देणार १० तगड्या ‘वेबसिरिज’

यंदा चित्रपटांना आव्हान देणार १० तगड्या ‘वेबसिरिज’

यंदा चित्रपटांना आव्हान देणार १० तगड्या वेबसिरिज

बॉक्स ऑफिसवर सिनेमांची होणारी टक्कर तुम्ही नेहमीच पाहता. पण, आता वेबच्या जमान्यात वेबसीरिजची चित्रपटांशी टक्कर होताना दिसणार आहे. आत्ता त्याची सुरुवात झाली असून वर्षाच्या पहिल्या महिन्यातच हा ‘वॉर’ आणखी वाढणार आहे. त्यामुळे यंदा ओटीटी प्लॅटफॉर्मचा पडदाही लार्जन दॅन लाईफ होणार आहे. चला जाणून घेऊ १० तगड्या वेबसिरिजसंदर्भात ज्या चित्रपटगृहांमध्ये जाणाऱ्या प्रेक्षकांना आकर्षिक करणार आहेत.

‘तांडव’
नववर्षाच्या सुरुवातीला सैफ अली खानची ‘तांडव’ वेबसिरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘तांडव’ करण्यास सज्ज झाली आहे. ‘सिक्रेट गेम्स’मध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका निभावणारा सैफ अली खान आता अब्बास जफर दिग्दर्शित ‘तांडव’ वेबसिरिजमध्ये राजकीय भूमिकेत झळकणार आहे. दिल्लीत सध्याच्या घडीला शेतकरी आंदोलनाचा मुद्दा चिघळत असतानाच या सिरिजमध्येही शेतकरी आणि विद्यार्थ्याच्या एकजूटीचे चित्रण करण्यात आले आहे. या सिरिजमध्ये सैफ अली खानसह डिंपल कपाडिया, तिगमांशु धुलिया, सुनील ग्रोवर, डिनो मोरिया, कुमुद मिश्रा आणि मोहम्मद जीशान अय्यूब मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

‘द फॅमिली मॅन 2’
बहुचर्चित ‘द फॅमिली मॅन’ या वेबसिरिजच्या पहिल्या सीजनच्या यशानंतर १२ फेब्रुवारीला दुसऱ्या सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या वेबसिरिजमध्ये मुख्य भूमिकेत मनोज बाजपेयी, प्रियमणी, शारिब हाशमी, समांथा अक्कीनेनी, गुल पनाग आणि श्रेया धववंतरी यांच्यासह अनेक कलाकार दिसणार आहेत. राज निदिमोरू आणि कृष्णा डीके दिग्दर्शित या वेबसिरिजमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सामान्य नोकरी करणार नोकरदार पुरुष इंटेलिजेंस एजेंसीसाठी गुप्तदार म्हणून काम करत आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशकतवाद्यांच्या मनसुब्यांवर कशाप्रकारे पाणी फिरवतो याचे चित्रण घडणार आहे.

‘गुल्लक 2’
प्रेक्षकांच्या मनात यशस्वीरित्या घर करणाऱ्या ‘गुल्लक’ या वेबसिरिजचा दुसरा सीजन १५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. वेबसिरिज निर्मात्यांनी वर्षाच्या शेवटी या सीजन २ ची घोषणा करत प्रोमो रिलीज केली. उत्तर प्रदेशातील मध्यम वर्गीय कुटुंबांना दैनंदिन जीवन जगताना येणाऱ्या अडचणींवर आधारित ही वेबसिरिज असून यात या कुटुंबांचा जीवनाशी सुरु असलेला संघर्ष दाखवण्यात येणार आहे. या सिरिजचा पहिला भाग घरगुती हिंसाचारवर आधारित होता आणि तो प्रेक्षकांच्या चांगला पसंतीस उतरला होता.

‘बाहुबली- बिफोर द बिगनिंग’

एसएस राजामौली फिल्म सिरिजच्या ‘बाहुबली’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील बक्कळ कमाई केल्यानंतर आता आनंद नीलकंठन लिखित ‘द राइज ऑफ शिवगामी’, ‘चतुरंगा’ आणि ‘क्वीन ऑफ माहिष्मती’ याचे अधिकार विकत त्यावर ‘बाहुबली- बिफोर द बिगिनिंग’ वेबसिरिज बनवण्याची घोषणा केली आहे. गेल्या दोन वर्षापासून या वेबसिरिजवर काम सुरु आहे. यावर्षी या वेबसिरिडचा पहिला सीजन ‘द राइज ऑफ शिवगामी’ इंग्रजी, तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज होणार आहे. ‘बाहुबली- बिफोर द बिगिनिंग’ सिरिजची संपूर्ण स्टोरी सहा सीजनची असणार असून यात मृणाल ठाकुर, राहुल बोस, अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ अरोरा, तेज सप्रू अशी स्टारकास्ट दिसणार आहे.

‘गंवार’
राज निदिमोरु आणि कृष्णा डीके यांच्याशी वेबसिरिजसाठी करार करत बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर डिजीटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. या वेबसीरिजची शुटिंग जानेवारी महिन्यातच सुरु होणार आहे. ‘गंवार’ या वेबसिरिजचे प्रसारण यावर्षाच्या शेवट्या तीन महिन्यात होण्याची शक्यता आहे. या वेबसिरिजमध्ये शाहिद कपूरसह तमिळ चित्रपट सृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते विजय सेतुपति मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

 

‘वांडाविजन’

मार्वेल स्टुडिओने यावर्षी बिग ,स्क्रिनबरोबरचं मोबाईल आणि टेबलेटवर धमाका करण्याची घोषणा केली आहे. यावर्षी मार्वेल स्टुडिओची पहिलीवहिची ‘वांडविजन’ वेबसिरिज १५ जानेवारला पाहता येणार आहे. सहा सिजनची असणारी ही वेबसिरिज मार्वेल सिने युनिवर्यच्या चौथ्या पर्वाची सुरुवात असणार आहे.

‘मनी हाइस्ट ५’

देशात कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण पाहता लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने मनोरंजनाचे सारे पर्याय बंद झाले होते. याचदरम्यान मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म अधिक प्रभावशाली माध्यम ठरले. यावेळी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक चर्चेत असलेली वेबसिरिज होती ‘मनी हाइस्ट’. या वेबसिरिजच्या चौथ्या सीजनने प्रेक्षकांना अक्षरश: वेडे केले होते. त्यामुळे आता या वेबसिरिजच्या पाचव्या सीजनची तय्यारी सुरु करण्यात आली आहे.

 

‘द फाल्कन एंड विंटर सोल्जर’

मार्वेल स्टुडिओजने अनेक प्रोजेक्टससह ‘द फाल्कन एंड द विंटर सोल्जर’ शीर्षक असलेल्या आणखी एका वेबसिरिजची घोषणा केली आहे. एमसीयूच्या चौथ्या पर्वाचा भाग असलेली ही वेबसिरिज १९ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरिजचा फस्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला असून प्रेक्षकांनी त्यांला अधिक पसंती दर्शवली आहे.

 

‘लोकी’
मार्वेल स्टुडियोज मे महिन्यात आणखी एका ‘लोकी’ या वेबसिरिजर प्रिमियर ठेवणार आहे. एमसीयूमध्ये ‘लोकी’ एक बहुचर्चित पात्र असून हे पात्र अभिनेते टॉम हिडिल्सटन पडद्यावर साकारणार आहेत. २०१८ मध्ये एमसीयूने रिलीज केलेल्या ‘एवेंजर्स- इंफिनिटी वॉर’ या चित्रपटातून ‘लोकी’ या पात्राचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर २०१९ मध्ये
एवेंजर्स- एंडगेम’मध्ये ‘लोकी’ हे पात्र पुन्हा दाखवत आले. यात ‘लोकी’ने वेळेच्या बाबतीत छेडछाड केल्याने त्याच्या जीवनात या समस्या निर्माण होतात. हे या आगामी वेबसिरिज दाखवण्यात येणार आहे.

 

‘स्नाइडर कट’

डीसी एक्सटेंडेड यूनिवर्सच्या ‘स्नाइडर कट’ या नावाने ओळखली जाणाऱ्या चित्रपटाचे खरे नाव आहे ‘जॅक स्नाइडर्स जस्टिस लीग’. हा चित्रपट एचबीओ मॅक्सवर मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ‘जस्टिस लीग’ हा चित्रपट २०१८ रोजी झाला होता परंतु चित्रपट ठीक झाला नसल्याचे दिग्दर्शक जॉर्ज मिलर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरला नाही. प्रेक्षकांची मागणी आहे की, या चित्रपटात ते खरे रुप दाखवा ज्यात ‘जॅक स्नाइडर’ने चित्रित केले होते. आता हा सिनेमा ‘स्नाइडर कट’ या नावाने वेबसिरिजच्या माध्यमातून बेन एफ्लेक, हेनरी कैविल, गैल गैडोट, जेसन मोमोए, कॉनी नीलसन आदी कलाकारांना घेऊन तयार केला जाणार आहे.


हेही वाचा – नववर्षात चॉकलेट बॉयचे चाहत्यांना सरप्राईज

First Published on: January 2, 2021 9:34 PM
Exit mobile version