काय फालतू चित्रपट आहे…; ‘पठाण’चा ट्रेलर पाहून ‘या’ अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया

काय फालतू चित्रपट आहे…; ‘पठाण’चा ट्रेलर पाहून ‘या’ अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘बेशरम रंग’आणि ‘झूमे जो पठाण’ही दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. ज्यातील ‘बेशरम रंग’गाण्यामुळे चित्रपटाला अनेकांकडून विरोध केला जात आहे. या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. अशातच 10 जानेवारी रोजी या चित्रपटाला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. सोशल मीडियावर अनेकजण या ट्रेलरला चांगला प्रतिसाद देत आहेत. अशातच चित्रपट समीक्षक केआरकेने ‘पठाण’च्या ट्रेलरवर टीका करायला सुरुवात केली आहे.

केआरके त्याच्या विचित्र चित्रपट समीक्षांमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो. मंगळवारी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’चित्रपटाचे अनेकजण कौतुक करत आहेत.

शिवाय याआधी देखील केआरकेने एक ट्वीट शेअर केलं होत ज्यात त्याने ‘पठाण’चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्यावर हॉलिवूड चित्रपटातील काही सीन कॉपी केल्याचा आरोप लावला होता. त्यावेळी केआरके म्हणाला होता की, “सिद्धार्थ एक असा दिग्दर्शक आहे ज्याला स्क्रिप्टबद्दल काहीही समजत नाही आणि तो फक्त परदेशी चित्रपटातील अॅक्शन सीन कॉपी करतो.” असं ट्वीट त्याने केलं होतं.


हेही वाचा :

‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, तासाभरात मिळाले मिलियन व्ह्यूज

First Published on: January 11, 2023 10:54 AM
Exit mobile version