‘बिग बी’ एवढ्या कपड्यांचं करतात तरी काय?

‘बिग बी’ एवढ्या कपड्यांचं करतात तरी काय?

अमिताभ बच्चन (प्रातिनिधिक फोटो)

बॉलीवूडचे माहानायक अमिताभ बच्चन नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. वर्ल्डकप जिंकल्याबद्दल फ्रान्सऐवजी आफ्रिकेला शुभेच्छा दिल्याबद्दल, नुकतेच बीग बी ट्रोल झाले होते. मात्र, आता ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. अमिताभ यांनी नुकताच ते वापरत असलेल्या कपड्यांबद्दल एक गजब खुलासा केला आहे. अमिताभ म्हणतात की, वापरुन जुने झालेले तसंच ओल्ड फॅशन झालेले कपडे मी कधीच टाकत नाही. अनेक वर्ष मी ते कपडे स्वत:जवळच ठेवतो. यामागे अमिताभ यांची असलेली खास भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.

कपडे कधी जुने होत नसतात

आमिताभ यांनी स्वत: लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये या विषयावरचं आपलं मत मांडलं आहे. ब्लॉगमध्ये त्यांनी लिहीलंय की, ”माझे जुने कपडे मी जपून ठेवतो कारण कपड्यांची फॅशन कधीच जुनी होत नाही. माझ्या मते, आज जुना झालेला कपड्यांचा फॅशन ट्रेंड कधी ना कधी पुन्हा नव्याने समोर येतो. त्यामुळे माझे जुने झालेले सर्व कपडे मी पुन्हा वापरण्याच्या हेतूने जपून ठेवतो”. बीग बी पुढे लिहितात, ”कपडे बनवणं किंवा ते डिझाईन करणं ही एक कला आहे. आपले कपडे बनवताना कारागिराने त्यावर खूप मेहनत घेतलेली असते. कपड्याचं डिझाईन, त्यातील कलाकुसर, त्याची शिलाई तसंच आपल्या मापानुसार केलेलं कपड्यांचं नेमकं कटिंग ही सगळं एक कला आहे आणि चांगली कला जतन करुन ठेवायला मला नेहमीच आवडतं.”

ब्लॉगमध्ये अमिताभ लिहितीत, ”या आणि अशा काही कारणांमुळे मी माझ्या जुन्या कपड्यांची विल्हेवाट लावत नाही. मी मला फिट न होणारे कपडे गरजू लोकांना दान करतो. तसंच जे कपडे पुन्हा फॅशन ट्रेंडमध्ये येऊ शकतात असं मला वाटतं, ते मी कपाटामध्ये जपून ठेवतो.”

First Published on: July 17, 2018 2:02 PM
Exit mobile version