अनुष्काचा ‘त्या’ ब्रॅण्डबद्दलचा वाद नेमका कशासाठी? नेटकरी म्हणाले ही तर स्ट्रॅटजी

अनुष्काचा ‘त्या’ ब्रॅण्डबद्दलचा वाद नेमका कशासाठी? नेटकरी म्हणाले ही तर स्ट्रॅटजी

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या चकदा एक्सप्रेस या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनेकदा अनुष्का चुकीच्या गोष्टींवर आपलं मत देखील व्यक्त करत असते. दरम्यान, अशातच अनुष्का आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे एका कपड्यांच्या ब्रँडने अनुष्काचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत जाहिरात केली आहे.

अनुष्का शर्माने घेतली PUMA ची शाळा

मी तुमची ब्रँड एम्बेसेडर नाही माझे फोटो काढा..

अनुष्काची कोणतीही परवाणगी न घेता तिचे फोटो शेअर केल्यामुळे तिने PUMA ब्रँडवर संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये अनुष्काने लिहिलंय की, “हॅलो @PUMAINDIA? मला वाटतंय तुम्हाला ठाऊक असेल की, जाहिरातीसाठी माझे फोटो घेण्यापूर्वी तुम्हाला माझी परवागणी घ्यायला हवी. कारण मी तुमची ब्रँड एम्बेसेडर नाही….कृपया माझे फोटो काढा…” दरम्यान, अनुष्काने सक्त ताकीद देऊनही PUMAINDIA ने अनुष्काचे फोटो डिलीट केले नाहीत.

दरम्यान, आता अनुष्का आणि PUMAINDIA च्या या पोस्ट प्रमोशनसाठी असल्याचं म्हटलं जात आहे.


हेही वाचा :

First Published on: December 20, 2022 10:18 AM
Exit mobile version