Met Gala नक्की काय आहे?

Met Gala नक्की काय आहे?

जसे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, मेट गाला फॅशन, नामांकित व्यक्ती आणि पॉप कल्चर मधील सर्वाधिक मोठ्या इवेंट्स पैकी एक आहे. हा नेहमीच स्टार-स्टडेड आणि फॅशनेबल ड्रेसेजने भरलेली संध्याकाळ असते. पण अलीकडल्या काळाता याचे रुप बदलले गेले आहे. मेट गासा बद्दल सध्या आपण अधिक ऐकतो आहोत. अखेर मेट गाला नक्की काय आहे? याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

खरंतर कॉस्ट्युम कंपनीसाठी पैसे जमा करण्यासाठी एलेनोर लॅम्बर्ट द्वारे एका इवेंटच्या रुपात सुरु झाला होता. तेव्हापासूनच तो प्रत्येक वर्षी पार पाडला जात आहे. जेव्हा डायना वेरलँन्डला कॉस्ट्युम इंस्टीट्युटच्या सल्लागाराच्या रुपात आणले गेले होते तेव्हा या कार्यक्रमाला एक वेगळे रुप आले. मेट गालाच्या इवेंटला मेट्रोपॉलिटन म्युजियम ऑफ आर्टमध्ये बदलले गेले आणि यामध्ये एक गाला थीम सुद्धा जोडली गेली. आता वोगचे एडिटर अन्ना विंटोर गेस्ट लिस्ट आणि थीमची देखरेख करतात. या इवेंटसाठी प्रत्येक वर्षी मेटसोबत काम करते. असे सुद्धा सांगितले जाते की, ती असे ठरवते हाय-प्रोफाइल पाहुणे कोणते डिझाइनर कपडे घालतात आणि कोणत्या पाहुण्यांना यासाठी निवडले जाते.

मेट गाला काय आहे आणि कधी होतो?
मेट गाला असा एक इवेंट आहे ज्याची जगभरात चर्चा सुरु असते. ऐतिहासिक रुपात तो मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो. म्हणजेच २०२३ रोजी १ मे ला पार पडणार आहे. मेट गाला मेटला मेट बॉलटच्या रुपात ही ओळखले जाते. या इवेंटला कॉस्ट्युम इंस्टिट्युट गालाच्या रुपात सुद्धा ओळखले जाते. हा गाला न्युयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट कॉस्ट्युम इंस्टीट्युला डेडिकेटेड एक फंडरेजर आहे.

थीमनुसार कपडे घालतात गेस्ट
मेट गाला कॉस्ट्युम कंपनी एनवल फॅशनचे उद्घाटन रात्रीच्या वेळेस असते. या कार्यक्रमाची थीम सेट केली जाते आणि पाहुणे त्यानुसार कपडे घालतात. परंतु प्रत्येक फॅशन ही कोणत्या ना कोणत्या फॅशन ब्रँन्डला डेडिकेटेड सुद्धा असते.

तर २०१७ मधील थीम ही री कवाकुबो/कॉमे डेस गार्कोन्स अशी होती. री कवाकुबो, अवंत-गार्डे जापानी लेबल आहे. ज्याच्या फॅशन डिझाइनरला श्रद्धांजली दिली गेली होती.

प्रत्येकालाच मिळते का याचे तिकिट?
मेट गाला प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी न्यूयॉर्क शहरात होते. मेट्रोपॉलिटन म्युजियम ऑफ आर्ट मध्ये तो आयोजित केला जातो. मेट गाला मध्ये सहभागी होणारे पाहुणे सर्वसामान्यणे आसपासच्या हॉटेलमध्ये राहतात.याची तिकिट कोणाला ही मिळू शकते. जर तुम्ही सेलेब नसाल तर तुम्हाला यासाठी बक्कळ पैसे भरावे लागतात.

यंदाच्या वर्षाची थीम काय?
२०२३ ची मेट गाला थीम कार्ल लेगरफेल्ड: ए लाइन ऑफ ब्युटी अशी आहे. दिवंगत डिझाइनर कार्ल लेगरफेल्डला सन्मानित करत यंदाची ही थीम तयार केली आहे. ज्यांना शेनल ब्रँन्डच्या डायरेक्टरच्या रुपात ओळखले जाते. लेगरफेल्ड हे फार जुने फॅशन जगातील नामांकित व्यक्तींपैकी एक मानले जाते.

First Published on: May 1, 2023 6:57 PM
Exit mobile version