जेव्हा बीग बी ना सलमानच्या नावाने हाक मारली जाते…

जेव्हा बीग बी ना सलमानच्या नावाने हाक मारली जाते…

मेगास्टार अमिताभ बच्चन आणि सलमान खान

अमिताभ बच्चन हे भारत देशाची शान आहेत यामध्ये कोणतंच दुमत नाही. पण भारताच्या या लेजंडला कोणी सलमान खानच्या नावानं हाक मारली तर? आश्चर्य वाटलं ना? कारण अमिताभ बच्चनला कोणी ओळखत नाही हा विचारही कोणाच्या मनात येणार नाही. इतकंच नाही तर या मेगास्टारला कोणी सलमान खानच्या नावानं हाक मारेल? पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वतःच ट्विट करून सांगितलं आहे.

काय घडलं नेमकं?

अमिताभ बच्चन सध्या स्कॉटलंडमधील ग्लास्गोमध्ये दिग्दर्शक सुजय घोषच्या ‘बदला’ चित्रपटाचं चित्रीकरण करत आहेत. ग्लास्कोच्या रस्त्यावर अमिताभ चालत असताना त्यांच्याजवळ एक कार अचानक येऊन थांबली आणि त्या कारमधील व्यक्तीनं जोरात ओरडत ‘काय सलमान खान, कसा आहेस?’ असं विचारलं. अमिताभ बच्चननी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून याबद्दल सांगितले आहे. त्यांनी फक्त काय झाले याबद्दलच ट्विट केले असून असे झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती हे मात्र कळू शकलेलं नाही. तर सलमान खानची यावर काय प्रतिक्रिया असेल हेदेखील आता पाहावं लागेल.

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

या ट्विटवर नेटिझन्सनं लगेच प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काहींचं म्हणणं होतं की, अमिताभ बच्चन यांना सलमान खान कशी काय हाक मारली जाऊ शकते? तर अमिताभ आणि सलमान हे दोघेही लेजंड असल्यामुळं अमिताभ यांना यामध्ये अपमान वाटण्याची काहीच गरज नाही अशीही प्रतिक्रिया काहींनी दिली आहे. तर काही नेटिझन्सचं म्हणणं आहे की, सलमान आणि अमिताभ यांच्या उंचीत खूपच फरक आहे. तर त्यानं सलमान खान कसं काय म्हटलं? तर असं म्हणणाऱ्या व्यक्तीनं इंग्रजी वा हिंदीमध्ये हे वाक्य म्हटलं याचीही काहींना उत्सुकता आहे.

First Published on: June 28, 2018 1:26 PM
Exit mobile version