‘अभी मूड नही है…’, असे म्हणत सलमानने ६ दिवस आधी मोडले लग्न!

‘अभी मूड नही है…’, असे म्हणत सलमानने ६ दिवस आधी मोडले लग्न!

सलमान खान

बॉलीवूड दंबग स्टार सलमान खान नेहमीच त्याच्या लग्नाच्या विषयावरून चर्चेत राहतो. सलमान खानचे लग्न कधी होणार हा जणू काही जागतिक प्रश्न बनला आहे. वयाची ५० शी पार केलेला हा सुपरस्टार अजूनही लाखो मुलींच्या गळ्यातील बनला आहे. असाही एकही कार्यक्रम किंवा चित्रपटाचे प्रमोशन नाही, जिथे सलमानला त्याच्या लग्नाविषयी विचारले नसेल. मात्र सलमानने नेहमीच हा प्रश्न हसून टाळला आहे. परंतू सलमानचे देखील लग्न ठरले होते. लग्नपत्रिका देखील वाटल्या होत्या आणि लग्नाच्या सहा दिवस आधीच सलमानने काढता पाय घेतला. ऐकून धक्का बसला ना. मात्र हा किस्सा स्वतः सलमान खानने जुने मित्र आणि निर्माते साजिद नाडियालवाला यांनी एका टीव्ही शोमध्ये सांगितला आहे.

काय आहे हा किस्सा 

सोनी वाहिनीवर दि कपिल शर्मा शोमध्ये हाऊसफुल्ल ४ चे कलाकार गेल्या आठवड्यात आले होते. या चित्रपटाचे निर्माता साजिद नाडियालवाला यांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली होती. शोचे सूत्रसंचालक कपिल शर्मा यांनी साजिदला हा महत्त्वाचा प्रश्न विचारला. कपिल म्हणाले की, तुम्ही आणि सलमान खान यांनी शपथ घेतली होती की, आयुष्यभर ब्रम्हचारी राहणार कधीही लग्न करणार नाही, मग तुम्ही लग्न कसे केले. यावर उत्तर देताना साजिद म्हणाले की, सलमान देखील लग्न करणार होते. मात्र लग्नाच्या ५-६ दिवस आधी म्हणाले, अभी मेरा मूड नही है. तर माझ्या लग्नाला तो आला असताना मला गुपचुप कानात म्हणाला, मागे गाडी उभी आहे, लवकरच लग्न मांडवातून पळ काढ. हा किस्सा सांगताच संपूर्ण कार्यक्रमात एकच हशा पिकला.

First Published on: October 23, 2019 10:18 PM
Exit mobile version