दोन दिग्गज मराठी अभिनेते भेटतात तेंव्हा !

दोन दिग्गज मराठी अभिनेते भेटतात तेंव्हा !

संतोष खामगांवकर

“सयाजी म्हणजे कचकचीत नट आणि करकरीत मित्र !” हे विधान आहे डॉ. गिरीश ओक यांचे. अभिनेता सयाजी शिंदेंबद्दल त्यांनी हे उद्गार काढले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या डॉ. ओक यांच्या 50व्या नाटकाच्या एका प्रयोगाला अभिनेता सयाजी शिंदे यांनी खास हजेरी लावली होती. या प्रसंगी डॉ. ओक (dr. girish oak) यांनी सयाजीबद्दलच्या जुन्या आठवणी शेअर केल्या. डॉ. गिरीश ओक आणि सयाजी शिंदेंनी (sayaji shinde) फार वर्षांपूर्वी गंगाराम गवाणकर लिखित व विनय आपटे दिग्दर्शित ‘वन रुम किचन’ आणि प्रवीण शांताराम लिखित व प्रकाश बुद्धिसागर दिग्दर्शित ‘आमच्या या घरात’ या दोन नाटकांमध्ये एकत्र काम केले होते. तेंव्हापासूनची त्यांची हि मैत्री !

काळाच्या ओघात एकाच कार्यक्षेत्रात आपआपला ठसा उमटवलेले हे दिग्गज वेगवेगळ्या दिशेलाच का होईना पण सातत्याने काम करीत राहिले. दोघांनीही यश संपादन केले. आज डॉ. गिरीश ओक यांनी तब्बल तीन दशकांपूर्वीच्या या आठवणींना उजाळा देत सोशल मिडियावर काही फोटोही शेअर केले. त्यासोबतच त्यांनी म्हटले की, “ज्या मित्रा बरोबर तुम्ही खुप सुरूवातीला नाटकात काम केलेलं असतं असा तुमचा मित्र तुमच्या 50 व्या नाटकाला आला तर काय वाटतं हे मी काल अनुभवलं.

सयाजी शिंदे असाच माझा खूप जुना मित्र. “वन रूम कीचन” आणि “आमच्या ह्या घरात” ही दोन नाटकं त्याच्या आणि माझ्या सुरूवातीच्या काळात आम्ही एकत्र केली. सयाजी म्हणजे कचकचीत नट आणि करकरीत मित्र.काल तो माझं “३८ कृष्ण व्हिला” बघायला आला त्याला नाटक खूप आवडलं.
बस आणखीन काय पाहिजे ?”


हे ही वाचा –  ‘समुपदेशक’ म्हणून पुष्कर श्रोत्रीची नवी इनिंग 

First Published on: October 27, 2022 6:25 PM
Exit mobile version