पनवेल बसस्टॉपवरची ती रात्र आणि निलेश साबळेच पूर्ण झालेलं स्वप्न!

पनवेल बसस्टॉपवरची ती रात्र आणि निलेश साबळेच पूर्ण झालेलं स्वप्न!

निलेशचे स्वप्न पूर्ण मायानगरीत घेतले घर

लोकप्रिय अशा ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात गेल्या तीन वर्षांपासून सूत्रसंचलन करत, ‘काय हसताय ना? हसायलाच पाहिजे’ असं आपुलकीने विचारणारा निलेश साबळे प्रेक्षकांच्या नेहमीच पंसतीस उतरला आहे. ‘फू बाई फू’ ते ‘चला हवा येऊ द्या’ या प्रवासामध्ये तो प्रेक्षकांसमोर सूत्रसंचालक म्हणून आला. केवळ निवेदनच नाही तर लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या सर्व जबाबदाऱ्या पेलणारा हा बहुगुणी कलाकार. या कलाकाराने कित्येक वर्षांपासून पाहिलेलं एक स्वप्न पूर्ण केलं आहे. आर्थिक व मनोरंजनाची राजधानी मुंबईत त्याने नुकतंच एक स्वत:च घर घेतलं आहे.

यासंदर्भातील एक पोस्ट निलेश साबळेचा मित्र आणि चला हवा येऊ द्या या कार्यकमातील जोडीदार अभिनेता कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर केली आहे. यामध्ये कुशलने एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये कुशलसह त्याची पत्नी सुनैना बद्रिके आणि निलेश साबळे त्याची पत्नी गौरी दिसत आहेत. या पोस्टखाली एक कॅप्शन देत त्याने निलेशच्या काही जुन्या आठवणी ताज्या करून दिल्या आहेत. ”काही वर्षांपूर्वी पनवेलच्या बसस्टॉपवर रात्र काढणाऱ्या मित्राला त्याच्या मुंबईतील स्वत:च्या घरासाठी खुप खुप शुभेच्छा. Dr. तुझं अभिनंदन आणि जिच्याशिवाय हे शक्यच झालं नसतं त्या गौरीचं खरं कौतुक”, अशा गोड शुभेच्छा कुशलने निलेशला दिल्या आहेत. यावरून एकंदरीत निलेश साबळेच्या यशामागचे कष्ट आणि स्ट्रगल दिसून येतं.

First Published on: February 19, 2020 8:18 PM
Exit mobile version