जान्हवी की सारा, कोण ठरणार सरस ? वाचा काय म्हणाला करण

जान्हवी की सारा, कोण ठरणार सरस ? वाचा काय म्हणाला करण

जान्हवी कपूर आणि सारा अली खान (सौजन्य- लेहेरे)

सैफची मुलगी सारा अली खान केदारनाथ आणि सिंबा या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. केदारनाथमध्ये सारा सुशांतसिंग रजपूतसोबत तर सिंबा या सिनेमात ती रणवीर सिंहसोबत दिसणार आहे. या आधी श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूरने सैराटचा हिंदी रिमेक ‘धडक’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यंदा बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारे हे दोन स्टार किड्स आहे. त्यामुळे साहजिकच यंदाचा डेब्यू अॅवार्ड कोणाला मिळणार ? अशी चर्चा रंगू लागली आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या दोन्ही स्टार किड्सचे सिनेमे आल्यामुळे करण जोहरला याबद्दल अनेक ठिकाणी कोण सरस असे विचारले जाते.

माहित आहे का? – साराला करायचं आहे ‘या’ स्टारला डेट

काय म्हणाला करण?

‘जान्हवी आणि सारा या दोघी उत्तम अभिनेत्री आहेत. त्या दोघांची तुलना या पुरस्कारासाठी करणे चांगले नाही. दोघांनी वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमांतून कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना मिळालेल्या संधी देखील वेगळ्या आहेत राहिला प्रश्न डेब्यू पुरस्काराचा तर पुरस्कारापेक्षाही काम महत्वाचे आहे आणि आनंदाची बाब अशी की, दोघांनी त्यांच्या पहिल्या सिनेमासाठी माझी निवड केली. यापेक्षा वेगळा आनंद काहीच नाही. त्यामुळे पुरस्काराचा फार विचार करु नये’

वाचा-जान्हवी पुन्हा दिसणार करणच्या चित्रपटात?

असा आहे साराचा केदारनाथ आणि सिंबा

केदारनाथ येथे २०१३ साली महाप्रलय आला. या महाप्रलयात केदारनाथचे नुकसाने झालेच. पण अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झाले. या महाप्रलायची आठवण करुन देणारा हा सिनेमा असणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरनंतर साराच्या अभिनयाविषयी कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे रोहित शेट्टीच्या सिंबा या सिनेमात देखील ती दिसली आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये साराला तिच्या आईसारखी दिसते असे म्हणत चिडवण्यात आले होते. त्यावेळी तिच्या अभिनयाची झलक दिसली होती.

‘धडक’लाच नाही

जान्हवी कपूरच्या सौंदर्याचे ज्या पद्धतीने प्रदर्शन करण्यात आले. त्यामानाने तिचा धडक हा सिनेमा धडकलाच नाही, असे म्हणावे लागेल. मराठीतील आर्ची आणि हिंदीतील पार्थ्वी अभिनयातून अनेकांना भावलीच नाही. त्यामुळे या सिनेमाची तशी फार कमाई झाली नाही. शिवाय आता जान्हवी करण जोहरच्या आणखी एका सिनेमात दिसणार आहे असे कळत आहे. तख्त नावाच्या सिनेमात जान्हवी एक महत्वाची भूमिका साकारणार आहे.

First Published on: December 4, 2018 3:59 PM
Exit mobile version