‘जेम्स बॉण्ड’साठी डॅनियल क्रेगला ४५० कोटींची ऑफर

‘जेम्स बॉण्ड’साठी डॅनियल क्रेगला ४५० कोटींची ऑफर

(फोटो प्रातिनिधिक आहे)

नवा जेम्स बॉण्ड कोण? जेम्स बॉण्डच्या भूमिकेत कोण दिसणार? या प्रश्नांची चर्चा आणि अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. हॉलिवूड अभिनेता ‘डॅनियल क्रेग’ हाच यापुढे ‘जेम्स बॉण्ड’च्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जेम्स बॉण्डच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर डॅनियलच्या नावाची घोषणा केली आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या बॉण्टपटात डॅनियल क्रेग  पाचव्यांदा बॉण्डची भूमिका साकारणार आहे. तसेच त्याला या नव्या सिरीजसाठी तब्बल ४५० कोटींची ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे, तर डॅनियल क्रेग या चित्रपटाचा कार्यकारी निर्माता देखील असणार आहे.

‘रॉयल’मध्ये सर्वप्रथम साकारला ‘बॉण्ड’

पिअर्स ब्रॉसने २००५ साली बॉण्डची शेवटची भूमिका वठवली होती. त्यानंतर २००६ साली आलेल्या ‘कसिनो रॉयल’मध्ये क्रेग हा सर्वप्रथम बॉण्ड बनला. त्यानंतर त्याचे एक नाही तर तीन बॉण्डपट आले. क्रेग याच्यानंतर ‘बॉण्ड’ची भूमिका कोण साकारेल? याची चर्चा होती. यात तिघांची नावं पुढे आली. त्यात इद्रिस एल्ब, टॉम हिडलस्टन आणि एडान टर्नर यांची नावे आघाडीवर होती. मात्र, पुन्हा एकदा डॅनियल क्रेगलाच पसंती मिळाली आहे.

डॅनियल हा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या यादीत

डॅनियल क्रेग हा ‘बॉण्ड’च्या भूमिकेत असणारच आहे. मात्र तो चित्रपटाचा कार्यकारी निर्माता देखील असणार असल्याचं समोर आलं आहे. यामुळे तो चित्रपटाच्या नफ्यातला मोठा भागीदार असणार आहे. तसं झाल्यास डॅनियल सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत दाखल होणार यात शंकाच नाही! या आधीच्या बॉण्ड सिरीजमधल्या ‘स्पेक्टर’साठी त्यानं ३३३ कोटी रुपये मानधन घेतल्याची माहितीही समोर आली आहे.

First Published on: May 30, 2018 5:03 AM
Exit mobile version