लाल सिंह चड्ढावर का टाकला जातोय बहिष्कार? आमिर खानने केली चित्रपट पाहण्याची विनंती

लाल सिंह चड्ढावर का टाकला जातोय बहिष्कार? आमिर खानने केली चित्रपट पाहण्याची विनंती

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ४ वर्षाच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा सिल्वर स्क्रिनवर लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या माध्यमातून दिसणार आहे. सध्या सगळीकडेच आमिर खानच्या या चित्रपटाती चर्चा सुरू आहे. अनेक दिवसांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या ‘लाल सिंह चड्ढा’वर आता बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.

‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटावर बहिष्कार
११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबाबत सध्या सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. सध्या ट्वीटरवर #BoycottLaalSinghChaddha हे ट्रेंड करत आहे. आमिर खान आणि करीना कपूरच्या या चित्रपटावर बहिष्काराची मागणी केली जात आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यावर बहिष्कार टाकला जात आहे. यादरम्यान, आमिर खानने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, “काही लोकांना वाटतं मला भारत आवडत नाही. मला खूप दुःख होतं, जेव्हा लोक माझ्या चित्रपटांवर अशाप्रकारे बहिष्कार टाकतात. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की, ते जो विचार करत आहेत, तो पूर्ण चुकिचा आहे. माझी त्यांना विनंती आहे की, माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नये आणि त्याला नक्की पाहा.”

खरंतर २०१५ मधील आमिर खानच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्या या चित्रपटावर बहिष्कार टाकला जात आहे. त्यावेळी त्याने एका मुलाखतीमध्ये आपला देश खूप सहिष्णू आहे, पण काही लोक इथे वाईट भावना पसरवतात. तसेच त्याची पत्नी किरण राव हिनेदेखील आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी भारत सोडणार असल्याचे म्हटले होते. त्यावेळी आमिर खानवर अनेक टीका करण्यात आल्या होत्या. त्याचं पार्श्वभूमीवर आता आमिरच्या चित्रपटाला विरोध केला जात आहे.

‘लाल सिंह चड्ढा’ लवकरच होणार प्रदर्शित
आमिर खान प्रॉडक्शन, किरण राव आणि वायाकॉम 18 स्टुडिओज निर्मित, ‘लाल सिंग चड्ढा’ मध्ये करीना कपूर खान, मोना सिंग आणि चैतन्य अक्किनेनी देखील आहेत. हा चित्रपट फॉरेस्ट गंपचा अधिकृत रिमेक आहे. लाल सिंग चड्ढा 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे.


हेही वाचा :मुंबई पोलीस अधिकाऱ्यांकडून सलमान खानला शस्त्रपरवाना मंजूर

First Published on: August 1, 2022 2:18 PM
Exit mobile version