Karishma Kapoor Wedding : ‘तू पुन्हा लग्न करणार का?’ चाहत्याच्या प्रश्नाला करिश्मा कपूरने दिले ‘हे’ उत्तर

Karishma Kapoor Wedding : ‘तू पुन्हा लग्न करणार का?’ चाहत्याच्या प्रश्नाला करिश्मा कपूरने दिले ‘हे’ उत्तर

'तू पुन्हा लग्न करणार का?' चाहत्याच्या प्रश्नाला करिश्मा कपूरने दिले 'हे' उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. करिश्मा इंडस्ट्रीपासून सध्या दूर असली तरी ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचा फॅन फॉलोवर्स लाखोंच्या घरात आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत आस्क मी एनीथिंग हे सेशन ठेवले होते. या सेशनमध्ये तिने युजर्सला तिचे आवडते पदार्थ, रंग आणि लग्न यावर उत्तर दिले. यानंतर तिच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

करिश्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आस्क मी एनीथिंग या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी नेटकऱ्यांनी करिश्माला पुन्हा लग्न करणार का? असा प्रश्न विचारला. यावर करिश्माने गोंधळलेल्या मुलीचा फोटो शेअर करत उत्तर दिले की, विचार करेन.

करिश्माने दिलेल्या या उत्तरामुळे ती लवकरचं लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आलिया आणि रणबीरच्या लग्नादरम्यान करिश्माच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले. करिश्माने आलिया- रणबीरच्या लग्नातील एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तिच्या हातात कलीरा असल्याचे दिसते. पंजाबी लग्नाच्या विधींमध्ये नवरी तिच्या लग्नाच्या बांगड्यांना जोडलेले असे सोन्याचे दागिने घालते. त्यानंतर ती तिच्या बहिणी आणि मैत्रिणींच्या डोक्यावर तिचे हात हलवते आणि जर त्यातील कलीरा कोणाच्या डोक्यावर पडला तर तिचं पुढचं लग्न असणार असे म्हटले जाते. त्यामुळे करिश्माच्या लग्नाची चर्चा सुरु झाली होती.

दरम्यान, करिश्माने आधी व्यावसायिक संजय कपूरशी 2003 मध्ये लग्न केले होते. तिला या लग्नापासून दोनं मुलं असून मुलीचं नाव समायरा आहे तर मुलाचं नाव कियान आहे. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकले नाही, दोघांनी 2014 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. आणि त्यानंतर 2016 मध्ये करिश्मा आणि संजय यांचा घटस्फोट झाला.


IAS Shah Faesal : काश्मीरची कैफियत मांडणारे UPSC टॉपर शाह फैसल पुन्हा सेवेत

First Published on: April 29, 2022 3:25 PM
Exit mobile version