गणेश आचार्य जबरदस्ती अश्लील व्हिडिओ दाखवायचे; महिला कोरिओग्राफरचा आरोप

गणेश आचार्य जबरदस्ती अश्लील व्हिडिओ दाखवायचे; महिला कोरिओग्राफरचा आरोप

गणेश आचार्य यांच्याविरोधात तक्रार दाखल

बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात एका ३३ वर्षीय महिला कोरिओग्राफरने अंधेरीतील आंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. गणेश आचार्य हे आपल्याला जबरदस्ती अश्लील व्हिडिओ दाखवत असल्याचा आरोप या महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. तसेच आचार्य हे आपल्याला फिल्म इंडस्ट्रीत काम मिळण्यासाठी अडचणी निर्माण करत असून आपल्याकडे कमिशन मागत असल्याचाही आरोप या महिलेने केला आहे.

या महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “गणेश आचार्य हे फिल्म अँड टेलीव्हीजन कोरिओग्राफर्स असोसिएशनचे सरचिटणीस आहेत. या पदावर आरूढ झाल्यापासून ते मला त्रास देत आहेत. मी जेव्हा आचार्य यांची म्हणणे ऐकले नाही, तेव्हा त्यांनी माझी असोसिएशनची सदस्यता रद्द करुन टाकली. यासोबतच त्यांनी मला त्यांची सहाय्यक म्हणून काम करण्यास सांगितले होते, मात्र मी त्यांना नकार दिला होता. मी इंडस्ट्रीत स्वतंत्रपणे काम करु इच्छित होते.”

मी जेव्हा जेव्हा सेटवर जायचे तेव्हा ते अश्लील व्हिडिओ पाहत असायचे. तसेच ते मलाही ते व्हिडिओ पाहायला लावायचे, असेही या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. २६ जानेवारी रोजी असोसिएशनची एक बैठक झाली होती. या बैठकीनंतर हा वाद सुरु झाला होता. या बैठकीला पीडित महिला पोहोचली आणि आपले म्हणणे मांडत होती. मात्र गणेश आचार्य यांनी महिलेला जबरदस्तीने बैठकीतून बाहेर काढले. तसेच इतर महिलांच्या मदतीने पीडितेला मारहाणही केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

पीडित महिलेने राज्य महिला आयोगाला लिहिलेले पत्र
First Published on: January 28, 2020 4:22 PM
Exit mobile version