‘वंडर वुमन’फेम गॅल गॅडोट तिसऱ्यांदा झाली आई, दिला गोंडस मुलीला जन्म

‘वंडर वुमन’फेम गॅल गॅडोट तिसऱ्यांदा झाली आई, दिला गोंडस मुलीला जन्म

'वंडर वुमन'गॅल गॅडोट तिसऱ्यांदा झाली आई ,दिला गोंडस मुलीला जन्म

हॉलिवूड मधील ‘वंडर वुमन’ (Wonder Woman)या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री गॅल गॅडोट (Gal Gadot) ने आपल्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. वयाच्या 35 व्या वर्षी गॅल गॅडोटने तीसऱ्या आपत्याला जन्म दिला आहे. गॅलने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे, तसेच गॅलने आपल्या मुलीचे नाव देखिल घोषित केले आहे. गॅलने मुलीचे नाव डेनिएला (Daniella) ठेवलं आहे, गॅलला याआधी दोनीही मुली आहेत आता गॅल तीसऱ्यांदा आई झाले असल्याची माहिती गॅलने सोशल मीडिया अकाउंटवर आगळ्या-वेगळ्या अंदाजात दिली आहे. गॅलने इंस्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर असा फॅमिली फोटो शेयर करत हि गोड बातमी शेअर केली आहे. आणि याला कॅप्शन देत लिहलं आहे की, ‘माझे सुंदर कुटूंब. मला अतिशय आभारी, आनंदी आणि थकल्या सारखा अनुभव होत आहे.आम्ही सर्वजण कुटूंबामध्ये डेनिएलाचं स्वागत करण्यासठी अत्यंत उत्साहित आहोत. मी तुम्हां सर्वांसाठी प्रेम आणि उत्तम आरोग्याची कामना करते’ गॅलच्या या पोस्टवर चाहत्यांनी अक्षरक्ष: लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. इतकचं नाही तर अनेक दिग्गज हॉलिवूड कलाकारांनी गॅलला शुभेच्छा दिल्या आहेत

वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास, गॅल गॅडोट (Gal Gadot) हॉलिवूड मधील अनेक बिगबजेट सिनेमात काम करत आहे. तसेच गॅल लवकरच क्लियोपॅट्राच्या बायोपिक मध्ये झळकणार आहे. या बायोपिक मध्ये क्लियोपॅट्राची भूमिका गॅल गॅडोट साकारणार आहे.


हे हि वाचा – अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक,ICU मध्ये केलं दाखल


 

First Published on: June 30, 2021 3:40 PM
Exit mobile version