‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’चा फर्स्ट लुक रिलीज

‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’चा फर्स्ट लुक रिलीज

ठग्ज ऑफ हिंदुस्तान

हिंदी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार महानायक अमिताभ बच्चन आणि मि. परफेक्शनिस्ट आमिर पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यश राज फिल्मसची निर्मिती असलेल्या ठग्ज ऑफ हिंदुस्तान या चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बिग बजेट आणि मेगा स्टारर चित्रपटाचा फर्स्ट लुक आज रिलीज करण्यात आला असून ८ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शीत होणार आहे. यशराजच्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी चित्रपटाचा लोगो आणि १.१७ मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

 ‘या’ कलाकारांची मांदियाळी

दिवाळीच्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटामध्ये आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासह कतरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या बिग बजेट चित्रपटात यापूर्वी कधीही न पाहिलेले व्ह्युजवल्स आणि टेक्निक पाहायला मिळणार असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. आज या चित्रपटाचा लोगो दाखवण्यात आला असून ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ चा ट्रेलर २७ सप्टेंबर म्हणजेच याश चोपडा यांच्या जयंतीनिमित्त रिलीज केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

यशराजचा ‘सुई धागा’ होतोय प्रदर्शीत 

दरम्यान, पुढील शुक्रवारी म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी यश राज फिल्मसचा ‘सुई धागा’ हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे. यामध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पहिल्यांदा ही जोडी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

 

First Published on: September 17, 2018 12:14 PM
Exit mobile version