शक्ती कपूरने पूर्ण केली युवराज सिंगची ‘ही’ इच्छा

शक्ती कपूरने पूर्ण केली युवराज सिंगची ‘ही’ इच्छा

क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेता शक्ती कपूर

भारताचा ऑलराउंडर क्रिकेटर युवराज सिंग हा मागिल अनेक वेळेपासून भारतीय क्रिकेट टीम पासून दुर राहिला. यावर्षी युवराज इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०१९) मध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या वतीने खेळत आहे. युवराज मैदाना बरोबर सोशल मीडियावरही जास्त अॅक्टिव्ह असतो. युवराज आपले कुटुंबीय आणि मित्रांचे फोटो नेहेमीच इंस्टाग्रामवर शेअर करत असतो. मात्र नुकताच त्याने शेअर केलेला व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडियोत युवराज बॉलिवूडचा जेष्ठ विलन शक्ती कपूर सोबत दिसत आहे. या व्हिडिओत युवराज शक्ती कपूरला एअरपोर्टवर भेटताना दिसतो आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

First Published on: February 4, 2019 3:24 PM
Exit mobile version