Appi Aamchi Collector : कलेक्टर अप्पीची उत्तराखंडला बदली

Appi Aamchi Collector : कलेक्टर अप्पीची उत्तराखंडला बदली

‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. कारण अप्पी आणि अर्जुन दोघेही आपल्या जीवनात वेगवेगळ्या वाटेवर निघायच्या तयारीत आहेत. सुजय आणि पियू मुळे सरकारांच सत्य समोर येत, सरकारांनी पैश्यांच्या लोभासाठी अर्जुनच्या आईची ट्रीटमेंट होऊ दिली नाही. हे ऐकून अर्जुन, विनायकला धक्का बसतो. सरकार त्यांची चुक मान्य करतात. चिडलेला अर्जुन विनायक, अप्पीसोबत आणि अमोलसोबत घरातून बाहेर जायचा निर्णय घेतो. तेव्हा सुजय अप्पीला हे सत्य माहित असल्याचे सांगतो, हे ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो. अप्पीही तिला सत्य माहिती असल्याचे मान्य करते. पण अमोलचा जन्म, त्याची अदलाबदल आणि त्यात अर्जुनला हे सत्य सांगून अजून त्रास द्यायचा नव्हता, म्हणून हे सत्य ती त्याच्या पासून लपवते. अर्जुन ते ऐकून अप्पीवर चिडतो, अर्जुनने भ्रष्टाचार केलेला तेव्हा त्याने स्वतःचा गुन्हा अप्पीसाठी आणि तिच्या तत्वासाठी मान्य केल्याचे आठवण करून देतो. पण आता अप्पी स्वतः तिच्या तत्वांना बगल देऊन एवढी मोठी गोष्ट लपवली असल्याने अर्जुन तिला सोडून विनायक सोबत घरातून निघतो.

स्वप्निल- रूपाली, अमोलसाठी एकदा अर्जुनशी बोलायचं ठरवतात. त्याचेवेळी सरकार येऊन अप्पीची माफी मागतात आणि अमोलसाठी सगळं नीट करूया असं सांगतात. सरकार व अप्पी अर्जुन-विनायकची माफी मागतात, पण अर्जुन ते काहीही ऐकून घेत नाही आणी त्यांना हाकलवून लावतो. बापूंना अप्पीची गोष्ट समजल्याने ते अप्पी व अर्जुनला अमोलसाठी एकत्र यायला सांगतात. पण त्याच दिवशी अप्पीला बदलीचे पत्र आलंय, आणि तिचं इथलं काम बघून तिची बदली उत्तराखंडला केली जाते आणि तिला ताबडतोब तिथे जावं लागणार असल्याचे कळतं. तेव्हा अर्जुनला सोडून जायचे की त्याच्या सोबत जायचे, हा प्रश्न अप्पीसमोर आहे.

अप्पी ह्या विचारात असताना, बापू अमोलला बापाची पण गरज असल्याची जाणीव अप्पीला करून देतात. अप्पी – अर्जुनला तिची बदली झाली असल्याचे सांगते. तेव्हा अप्पीसोबत त्याचे काम सोडून, इथलं सगळं आयुष्य सोडून उत्तराखंडला जाणे किंवा इकडेच राहणे असे दोन पर्याय असताना, अप्पीने आईबद्दल गोष्टी लपवल्यामुळे अर्जुन इकडेच राहायच निर्णय घेतो. अर्जुन अप्पीला, अमोलला त्याचा बाबा हरवला असल्याचे सांगायला सांगतो. जेणेकरून तो अप्पीलाच आई व बाबा मानून जगायला शिकेल, जसा अर्जुन स्वतः त्याची आई गेल्यावर विनायकलाच आई-बाबा समजून जगत होता. अप्पीपुढेही काही पर्याय नसल्याने अप्पी अमोलला घेऊन उत्तराखंडला निघून जाते. अप्पी आणि अर्जुनच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय ? ते दोघे पुन्हा एकमेकांजवळ शकतील? हे सर्व येणाऱ्य़ा भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

हेही वाचा : Marathi Film Chaiwala : रुपेरी पडद्यावर अवतरणार मराठमोळा ‘चायवाला’

____________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

First Published on: April 23, 2024 1:11 PM
Exit mobile version