‘ड्रीम गर्ल’चे चाहते होते वाजपेयी!

‘ड्रीम गर्ल’चे चाहते होते वाजपेयी!

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपयी यांना ‘कवी’ मनाचा राजकारणी म्हणून ओळखलं जायचं. संगीत आणि अन्य विविध कलांचा आस्वाद घेणारा एक रसिक अशी वाजपेयींची एक ओळख होती. अटलबिहारी वाजपेयी आणि त्यावेळेची आघाडीची अभिनेत्री हेमा मालिनी (सध्याच्या भाजप खासदार) यांच्यातही एक खास नातं होतं. हे नातं होत कलाकार आणि चाहत्याचं. अटलजी हेमा मालिनी यांचे खूप मोठे चाहते होते. हेमा मालिनी यांच्या अभिनयाचे अटलजी वेळोवेळी कौतुक करत असत. आपल्या कामातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अटलजी आवर्जून हेमाजींचे चित्रपट पाहत असत. अटलजी हेमा मालिनी यांचे इतके मोठे चाहचे होते की त्यांनी हेमाजींचा एक चित्रपट तब्बल २५ वेळा पाहिला होता. तो चित्रपट होता ‘सीता और गीता’. १९७२ साली आलेला हेमाजींचा सीता और गीता हा चित्रपट तूफान गाजला होता. या चित्रपटात हेमा मालिनींचा डबल रोल होता. याशिवाय अभिनेते धर्मेंद्र  आणि संजीव कुमार यांच्याही मुख्य भूमिका होत्या. अटलजींनी हा चित्रपट तब्बल २५ वेळा पाहिला होता. या बातमीचा खुलासा खासदार हेमा मालिनी यांनी स्वत: एका कार्यक्रमामध्ये केला होता.

फोटो सौैजन्य- सोशल मीडिया

मगतीचा भाग म्हणजे अटलजी आपल्या अभिनयाचे चाहते आहेत, ही गोष्ट बरीच वर्ष स्वत: हेमा मालिनी यांनाही ठाऊक नव्हती. हेमाजींना एका मुलाखतीत सांगितल्यानुसार, ‘त्या एकदा भाजप पदाधिकाऱ्यांशी बोलताना म्हणाल्या- की मी नेहमीच माझ्या भाषणात अटलजींचा उल्लेख करते. मात्र आजपर्यंत त्यांची माझी कधीच भेट झाली नाही. हे ऐकल्यानंतर काही भाजप अधिकाऱ्यांनी हेमा मालिनी आणि अटलजी यांची भेट घडवून आणली. या भेटीदरम्यान अटलजी आपले किती मोठे चाहते आहेत, हे हेमाजींना समजलं. तसंच त्यावेळी अभिनयासाठी माझ्या अभिनयासाठी त्यांनी ‘सीता-गीता’ हा चित्रपट २५ वेळा पाहिल्याचंही अटलजींनी मला सांगितलं’, असंही खासदार हेमा मालिनी यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

‘सीता और गीता’ चित्रपटात हेमा मालिनी यांचा डबल रोल होता
First Published on: August 17, 2018 10:48 AM
Exit mobile version