अस्सल नाशिकच्या चवीचे मटण

अस्सल नाशिकच्या चवीचे मटण

Hotel Divtya-Budhlya

नाशिकचे रहिवाशी नसताना तुम्ही नाशिकला येथील खास खाद्यपदार्थ खाण्याच्या उद्देशाने गेला तर त्याने प्रथम घराचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. नाहीतर कोणी अस्सल नाशिककर तरी तुमच्यासोबत हवा. तरच नाशिकमधील अस्सल मिसळ, मटण यांचा स्वाद घेऊ शकता.

वृत्तपत्राच्या कामासाठी वारंवार नाशिकला जाणे होत असे. त्यावेळी नाशिकच्या खाद्यपदार्थांचा स्वाद चाखण्याची संधी मिळाली. तीपण खास नाशिकच्या अंदाजात. नाशिकचे रहिवाशी नसताना तुम्ही नाशिकला येथील खास खाद्यपदार्थ खाण्याच्या उद्देशाने गेला तर त्याने प्रथम घराचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. नाहीतर कोणी अस्सल नाशिककर तरी तुमच्यासोबत हवा. तरच नाशिकमधील अस्सल मिसळ, मटण यांचा स्वाद घेऊ शकता. नाहीतर कुठल्या तरी हॉटेलमध्ये बसून दुधाची चहा, ताकावर भागवावी लागते. मी जेव्हा जेव्हा नाशिकला गेला तेव्हा माझ्यासोबत आमचा अस्सल नाशिककर वार्ताहरसोबत असायचा. त्यामुळेच मी अस्सल नाशिकच्या पदार्थांचा स्वाद घेऊ शकतो.

असेच एकदा नाशिकमध्ये असताना मी आमच्या वार्ताहराकडे मटण भाकरी खाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी त्याने चटकन, साहेब दिवट्या बुधल्यामध्ये जाऊ या, असे सांगितले. मला आश्चर्य वाटले. दिवट्या बुधल्या हे काय असा प्रश्न मी त्याला केला. तर ते हॉटेल असल्याचे कळते. नाव विचित्र होते. त्यामुळे मीही त्याला लगेच होकार दिला. मग त्याच्या बाईकवरून आमची स्वारी दिवट्या बुधल्या हॉटेलकडे वळली. तो वार नॉनवेज नव्हता. त्यामुळे हॉटेलमध्ये गर्दी तशी कमीच होते. नॉनवेजच्या वाराला येथे लाईन लावावी लागते, अशी माहिती मला पुरावण्यात आली. हे हॉटेल अतिशय साधे. इंटिरियर नावाचा प्रकार नव्हता. बाक, बसयला खुर्चा असा एकंदरीत हॉटेलचा आकार आणि उकार. मटण आणि कडक भाकरीची ऑर्डर आम्ही दिली. हॉटेलचे संचालक प्रवीण पवार हे आमच्या वार्ताहराच्या ओळखीची असल्यामुळे त्यांनीच हा मेन्यू सुचवला होता.

त्यानंतर पवार साहेब स्वत: आमच्यासोबत गप्प मारू लागले. ते म्हणाले की, हॉटेलमध्ये सर्व्ह केले जाणारे मटण मी स्वत: जातीने पहातो. ते लुसलुसीत असेल याची खात्री करतो. नाशिकमधल्या नामांकीत मसाल्याच्या दुकानातून मसाला खरेदी करतो. पूर्वी आई मटण शिजवायची. आता मात्र तीने शिकवलेल्या पद्धतीनुसार, मीच मटण तयार करतो. मटण काळ्या मसाल्यात बनवले जाते. पण तुम्ही कितीही खाल्ले तरी तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा त्रास होणार नाही, असे पवार म्हणाले. त्यानंतर मी त्या मटणावर ताव मारला. मटण खरंच लुसलुसीत होते. चावताना अजिबात त्रास झाला नाही. चव म्हणाल आज सुमारे दोन वर्षांनंतरही ती चव माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. त्या मटणाच्या वासानेच अर्धी भाकरी पोटात गेली होती. त्यासोबत रस्सा.

मी मुंबईचा, त्यामुळे रस्सा जरा बेतानेच प्यावा असा विचार करून हॉटेलमध्ये शिरलो होतो . पण रस्सा जिभेला लागल्यावर मात्र काय व्हायचे ते होऊ देत पण रस्सा प्यायचा असा पण एका क्षणात करून मोकळा झालो. त्यानंतर सात ते आठ वाटी रस्सा पोटात शिरला. मटणाची अस्सल नाशिक चव चाखण्यासाठी दिवट्या बुधल्यात गेलेच पाहिजे. तुम्ही कधी नाशिकला गेलात तर गंगापूर नाक्यावरील दिवट्या बुधल्यात जात आणि तेथील मटणभाकरीची चव चाखा. तुमची नाशिक वारी सार्थकी लागल्याचे समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा हे सर्व आपल्या खिशाला परवडण्यासारखे आहे. पाचशे रुपयांत दोन माणसे अगदी पोटभर जेऊ शकतात.

First Published on: November 19, 2018 5:27 AM
Exit mobile version