डॉलर्सची दिवाळी….

डॉलर्सची दिवाळी….

दिवाळी

यंदाच्या वर्षीही बिग बिलिअन डे आणि ग्रेट इंडियन फेस्टिव्हलच्या निमित्ताने ई कॉमर्स कंपन्यांनी जय्यत तयारी केली आहे. यंदाच्या दिवाळीत ३ अब्ज डॉलर्स इतकी उलाढाल एकट्या ई कॉमर्सवर होईल अशी अपेक्षा केली जात आहे.

संपूर्ण वर्षभर ई कॉमर्लची जितकी उलाढाल असते त्या तुलनेत एकट्या दिवाळी फेस्टिव्हलमध्ये मिळणार उत्पन्न सर्वाधिक असे असते. त्यामुळेच या दिवसासाठी कंपन्या सर्वाधिक अशी गुंतवणुक करताना दिसतात. यंदाच्या दिवाळी फेस्टिव्हलसाठी नुसत्या जाहिरातीवरच कंपन्यांमार्फत ४०० कोटी रुपयांची गुंतवणुक होणे अपेक्षित आहे. गेल्यावर्षी कंपन्यांनी ३६० कोटी रुपये एकट्या दिवाळी सणाच्या जाहिरातीसाठी केली होती. या जाहिरातीच्या बजेटच्या तुलनेत एमेझॉन, फ्लिपकार्ट या कंपन्यांनी गेल्या दिवाळीत १.५ अब्ज डॉलर्स इतका महसूल मिळवला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेच यंदाच्या वर्षी या महसुलामध्ये १० टक्के भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये होणारी ही उलाढाल आहे.

फ्लिपकार्टच्या बिग बिलिअन डे यंदा १० ऑक्टोबरला सुरू होणार आहे. अवघ्या पाच दिवसाच्या कालावधीत ही सगळी ई कॉमर्सची उलाढाल होण अपेक्षित आहे. सर्वसामान्य नोकरदार वर्गाच्या महिन्याच्या पगाराच्या तारखाच यंदाच्या ई कॉमर्स धमाका सेलसाठीच लक्ष्य आहे. एकट्या फ्लिपकार्टने १.५ अब्ज डॉलर्स ते १.७ अब्ज डॉलर्स इतकी उलाढाल अपेक्षित केली आहे. ई कॉमर्समध्ये खरेदीसाठी सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फॅशन साईट्स मिंत्रा आणि जबाँगच्या माध्यमातून ही उलाढाल करण्याचे उदिष्ट फ्लिपकार्टने ठेवले आहे.

ऑनलाईन किराण्यापासून ते फर्निचर, पेटीएम मॉल यासारख्या ई कॉमर्समधील बड्या कंपन्याही ऑनलाईन सेलच्या निमित्ताने मोठी जाहिरात केली आहे. इंडिया के खुशियो की बीच बजेट नही आना चाहिए अस म्हणत एमेझॉनने यंदाच्या दिवाळीच्या सेलची जाहिरात केली आहे. यंदाच्या दिवाळी शॉपिंगसाठी एमेझॉनने ईएमआयचा पर्यायही देऊ केला आहे. फ्लिपकार्टचा कार्डलेस क्रेडिटचा पर्यायही यंदाच्या दिवाळीच्या खरेदीसाठी दिला आहे.

First Published on: October 1, 2018 1:03 AM
Exit mobile version