विवाहबाह्य संबंध महिलांसाठी घातकच!

विवाहबाह्य संबंध महिलांसाठी घातकच!

शेवटी मी स्वतः त्याला दुसर्‍या नंबर वरून विचारलं तर त्याने एक वाक्यात उत्तर दिलं, ‘तू त्या दिवशी रडलीस, भावनावश झालीस. ते मला अजिबात आवडलेले नाहीये. मला अशी कोणतीही इन्व्हॉल्वमेंट आपल्यात नकोय आणि तू बहुतेक माझ्यात इन्व्हॉल होत आहेस. त्यामुळे इथून पुढे मी तुला भेटू शकणार नाहीये.’ चैताली मात्र प्रचंड डिस्टर्ब झाली होती. एक वर्षाचे संबंध त्याने एका ओळीच्या उत्तराने संपवले होते.

या घटनांमधून हाच निष्कर्ष निघतो की जेव्हा कोणतीही विवाहित महिला दुसर्‍या पुरुषासोबत रिलेशन शिपमध्ये असते, तेव्हा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टकोन किती संकुचित असतो.वास्तविक महिला स्वतः च्या बिघडलेल्या वैवाहिक आयुष्यातून सावरायला एखाद्या पर पुरुषासोबत रिलेशन स्वीकारते. परंतु, अशा वागणुकीने तिच्या जखमेवर मीठ चोळले जाते, हे कितपत माणुसकीला धरून आहे. त्यामुळे महिलांनी केवळ भावनेच्या आहारी न जाता माणसं ओळखणं महत्वाचे आहे. महिला अतिशय संवेदनशील असल्यामुळे त्यांना त्यांची केलेली स्तुती, त्यांच्या सौंदर्याची प्रशंसा याने समोरील व्यक्तीची लगेच भुरळ पडते. आपला पती आपल्याला ओळखू शकला नाही पण या परक्या पुरुषाने आपले गुण हेरले. त्यावेळेस त्या त्यांची सद्सद विवेकबुद्धी वापरत नाहीत आणि स्वतः च्या आयुष्यात स्वतः हुन अजून अडचणी निर्माण करतात. कोणत्याही स्त्रीला पटवणं अतिशय सोपं आहे. तिच्या भावनांशी खेळण त्याहून सोपं आहे असा अंदाज अनेक पुरुषाचा असतो. त्यातून ही स्त्री जर विधवा, घटस्फोटिता असेल तर मग विचारायलाच नको. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, जेवलीस का, झोपलीस का, डीपी छान आहे. या सारखे साचेबद्द डायलॉग मारले अनेकदा महिलांना आत्मिक समाधान मिळते. त्यातून त्या देखील असे संभाषण ठेवतात आणि कळत नकळत स्वतः च्या भावनांशी एखाद्याला खेळायची परवानगीच देतात.

त्यातून समोरची व्यक्ती उच्चपदस्थ, समाजात नाव लौकिक असणारी, आणि पैसेवाली, प्रसिद्ध असेल तर स्त्रियांना हा अभिमान वाटतो की इतक्या मोठया व्यक्तीला मी आवडले, त्याने स्वतः हुन त्याच्या फीलिंगची कबुली मला दिली. अशा व्यक्तीचा मला आधार मिळाला तर मी समाजात सुरक्षित राहू शकेल. मला ही व्यक्ती मदत करेल आणि कोणी मला त्रास देणार नाही. पण याठिकाणी त्या व्यक्तीच्या नाव लौकिकावर फिदा होण्यात काय अर्थ आहे. जे नाव आपण लावून समाजात राजरोस वावरू शकत नाही. शालिनी ( काल्पनिक नाव ) अशीच एका सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाशी नातं जोडते आणि आपल्या आयुष्यातील मयत झालेल्या पतीची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करते. तिला वाटतं असते की ही व्यक्ती आपल्याला चांगला व्यवसाय किंवा नोकरी यासाठी त्याचा शब्द वापरेल किंवा त्याच वजन वापरून आपली काही शासन दरबारीं कामे होतील. परंतु, तिच्या कामाचा किंवा तिला कोणतीही मदत करण्याचा विषय निघाला की ही व्यक्ती चालढकल करणार आणि फक्त भेटणं बोलण ते पण एकदम काटेकोर आणि काळजी पूर्वक ते ही शालिनीच्याच घरात, स्वतः ला जराही तोशीस न लागू देता.

शालिनीने जेव्हा सहज एकदा या महनीय व्यक्तीला विचारले की तुम्ही माझं नाव का सुचवत नाहीत. एखाद्या नोकरीसाठी तेव्हा त्या व्यक्तीने उत्तर दिले की , ‘तु विधवा आहेस आणि तुझं नाव मी कुठे पुढे केले तर लोक माझ्याकडे संशयाने पाहतील. माझ्या सामाजिक कारकिर्दीवर याचा परिणाम होऊ शकतो. तु तुझ्या पद्धतीने प्रयत्न कर माझा नाईलाज आहे.’ शालिनी रडून सांगत होती की, तिने त्या व्यक्तीसामोर त्याच्या घरी सहज म्हणून येण्यासाठी विचारणा केली तर त्याच उत्तर एकूण तिला धक्का बसला. ही महनीय व्यक्ती तिला म्हटली की पायातली चप्पल कितीही सुंदर असली तरी आम्ही ती घराबाहेर काढतो. तुला आगा पिछा नाहीये, पण मला माझं कुटुंब आहे. त्यांच्यासमोर तुला नेण्याची देखील तुझी लायकी नाहीये. शालिनीला खूप समजून सांगावं लागेल. किंबहुना अशा परिस्तिथीमध्ये अडकलेल्या सर्व महिलांना हेच सांगावस वाटतं की, अशा कोणत्याही नाव लौकिकास बळी पडून स्वतः च आयुष्य पणाला लावू नका. रीतसर कायदेशीर लग्न करा, आपली आयुष्यभर साथ देईल आपल्याला नाव देईल, असा जोडीदार निवडा स्वतः सोबत स्वतः च्या मुलांची फरफट होऊ देऊ नका. अशा कोणत्याही रिलेशनचा काहीच शेवट नसतो. वेळ निघून गेल्यावर पच्छाताप करण्याशिवाय हातात काहीच येत नाही.

 

 

 

 

-मीनाक्षी जगदाळे

 

First Published on: May 27, 2021 3:11 PM
Exit mobile version