गांधी जयंती विशेष: चित्रपटांमधले ‘बापू’

इतिहासात होऊन गेलेल्या अथवा हयात असलेल्या काही मोठ्या राजकीय नेत्यांवर, क्रांतीकारकांवर किंवा खेळाडूंवर आधारित असे अनेक बॉलीवूडपट आजवर आले आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी देखील याला अपवाद नाहीत. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात खूप मोठे योगदान देणाऱ्या महात्मा गांधींवर आतापर्यंत एकूण ५ चित्रपट बनले आहेत. त्यामुळे आजही बापू रुपेरी पडद्याच्या माध्यमातून लोकांमध्ये जिवंत आहेत. आज गांधींची १५०वी जयंती आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया, महात्मा गांधीं यांच्यावर बनलेल्या प्रमुख ५ चित्रपटांविषयी.

१. गांधी (१९८२) 

या चित्रपटातील गांधींची भूमिका त्याकाळी खूप गाजली होती. बेन किंग्सले या अभिनेत्याने चित्रपटात गांधीजींची भूमिका साकरली होती. चित्रपटातील वास्तवदर्शी आणि प्रभावशाली सादरीकरण यामुळे ‘गांधी’ हा चित्रपट आजवरच्या दर्जेदार चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

गांधी (१९८२) 

२. गांधी से महात्मा तक (१९९६)

गांधी पेशाने बॅरिस्टर (वकिल) होते हे आपल्याला ठाऊक आहेच. गांधीजींचा वकील झाल्यानंतरचा महात्मा होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतून उच्चशिक्षण घेऊन आलेल्या मोहनदास करमचंद गांधी या तरुणाचा ‘महात्मा’ बनण्यापर्यंतचा संपूर्ण जीवनकाळ चित्रपटात दाखवण्यात आला होता. अभिनेत्री पल्लवी जोशीने या चित्रपटात भूमिका केली होती.

 गांधी से महात्मा तक (१९९६)

३. हे राम (२०००)

कमल हसन आणि नसिरुद्दिन शाह यांच्या मुख्य भूमिके असलेला ‘हे राम’ हा चित्रपट खूप गाजला. मात्र, चित्रपटातील काही दृश्यांमुळे त्यावेळी कॉन्ट्रव्हर्सी देखील निर्माण झाली होती. कमल हासनने साकारलेल्या साकेत राम या पात्राच्या आयुष्यावर गांधीजांचा कसा प्रभाव पडतो याची कथा म्हणजे हे राम चित्रपट. शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांच्याही चित्रपटात भूमिका होत्या.

हे राम (२०००)

४. लगे रहो मुन्नाभाई (२००६)

मराठीतील ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर यांनी या चित्रपटात गांधींची उत्तम भूमिका साकारली होती. आजच्या तरुणाईला भिडणारे लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातून मांडण्यात आले आहेत. संजय दत्तने साकारलेल्या ‘मुन्नाभाई’ या गुंडाच्या आयुष्यात गांधीजींचा कसा प्रभाव पडतो यांची उत्कृष्ट मांडणी या चित्रपटातून करण्यात आली आहे.

लगे रहो मुन्नाभाई (२००६)

५. गांधी माय फादर (२००७)

अभिनेता अक्षय खन्ना याची मुख्य भूमिका असलेला गांधी-माय फादर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटात गांधींची राजकीय कारकिर्द न दाखवता त्यांचं खासगी आयुष्य आणि त्यातील घडामोडी दाखवण्यात आल्या होत्या.

गांधी माय फादर (२००७)

पाहा: पंतप्रधान मोदी बनले ‘महात्मा’

First Published on: October 2, 2018 11:23 AM
Exit mobile version