अपंगत्व असूनही सुरेल गायन करून छंद जोपासणारा ‘अवलिया’!

अपंगत्व असूनही सुरेल गायन करून छंद जोपासणारा ‘अवलिया’!

नवीन पोतदार रेल्वे स्थानकावर गाताना.

मुंबई अतिशय धाकधुकीचं शहर म्हणून ओळखल जातं. या मुंबापुरीत वेगवेगळं काम करून आपलं पोट भरणारे हजारो हात धडपडताना दिसतात. रेल्वे स्टेशन आणि इतर ठिकाणी भीक मागून पोट भरणारे हजारो हात देखील आपल्या नजरेला पडतात. पण एखाद्या कलेच्या जीवावर जगणारे काही कलाकार मात्र त्या कलेने सगळ्यांना मोहित करत असतात.

मुंबईमध्ये चर्चगेट हे महत्त्वाचं रेल्वे स्टेशन म्हणून ओळखल जातं. या रेल्वे स्टेशनवर अफाट माणसांच्या गर्दीत नवीन पोतदार हा आपल्या सुरेल गायनाने सगळ्यांचं लक्ष आकर्षित करतोय. नवीन मूळचा बिहार मधला आहे. गेल्या ८ महिन्यांपासून मुंबईमध्ये नालासोपाऱ्याला वास्तव्यास आहे. एका खाजगी बीपीओ कॉलसेंटर कंपनीत काम करत आपल्या गायनाची आवड जपत त्याने आपली कला नवीनने चांगलीच विकसित केलीय.

दर मंगळवारी आणि शनिवारी न चुकता केवळ पाच तास गायनाचा सराव करतो. नवीनने काम करून गाता यावं यासाठी एक संगीत उपकरण सुद्धा विकत घेतलंय, ज्याची किंमत जवळपास 6 हजार रुपये आहे.

स्टेशनवर गात असताना नवीन भोवताली अनेक लोकांचा घोळका जमत असतो. त्याचा सुरेल आवाज ऐकून अनेक लोकांकडून त्याला वेगवेगळ्या कार्यक्रमात गाण्यासाठी संधीही मिळते. फक्त पैसे मिळवता यावेत म्हणून नाही तर लोकांचं मनोरंजन व्हावं म्हणून नोकरी असूनही नवीन हा आगळावेगळा छंद जोपासत असल्याचं सांगतो.

मुंबईमध्ये रेल्वे आणि इतर ठिकाणी बरेच लोक पैशासाठी वेगवेगळ्या कला दाखवत असतात. पण पायाला अपंगत्व आलं असतानाही आपला छंद जोपासून लोकांसाठी गाणारा नवीन याला अपवाद आहे. चांगली संधी मिळाली तर गाण्याच्या क्षेत्रात काहीतरी करता येईल, अशी भावना नवीन व्यक्त करत आहे.

First Published on: May 10, 2018 10:03 AM
Exit mobile version