नोटांमध्ये दडलंय ‘ऐतिहासिक’ आणि ‘नैसर्गिक’ सौंदर्य

नोटांमध्ये दडलंय ‘ऐतिहासिक’ आणि ‘नैसर्गिक’ सौंदर्य

नवीन आलेल्या १० रुपयाच्या नोटेपासून ते नोटबंदीच्या नंतर गाजलेल्या २००० रुपयांच्या नोटेपर्यंतच्या अनेक नोटा आपण दैनंदिन व्यवहारात वापरत असतो. प्रत्येक नोटेचे एक खास वैशिष्ट्य देखील आहे. प्रत्येक नोटेचा आकार, रंग आणि त्यावर छापलेली चित्रं यामुळे प्रत्येक नोट ही दुसरीपेक्षा वेगळी दिसते.

‘ऐतिसाहासिक’ वारसा जपणाऱ्या नोटा

जुन्या ५० रुपयाच्या नोटेच्या मागच्या बाजूला ‘संसदेचे’ चित्र आहे, तर ५०० रुपयांच्या नव्या नोटेमागे ‘लाल किल्ल्याचे’ चित्र छापले आहे. दुसरीकडे ५० रुपयांच्या नव्या नोटेवर ‘हम्पी टेम्पल’ आहे, तर २०० रुपयाच्या नोटेवर ‘सांची स्तूप’ छापण्यात आला आहे. १० रुपयाच्या नव्या नोटेवर ‘कोणार्क’चं ‘सूर्य मंदिर’ आहे. या सगळ्या वास्तू आपल्या देशाच्या ऐतिहासिक वारश्याची ओळख करुन देतात.

‘नैसर्गिक सौंदर्याचे’ प्रतिक

दैनंदिन चलनातील अशा २ नोटा आहेत, ज्यांवर आपल्याला नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळतं. जाणून घेऊयात त्या नोटांविषयी आणि त्यात दडलेल्या सुंदर स्थळांविषयी.

२० रुपयाची नोट

२० रुपयाच्या गुलाबी नोटेच्या पाठीमागे छापलेले सुंदर ठिकाण आहे अंदमान. अंदमानमधील ‘नॉर्थ बे’ या आयलंडचं हे चित्र आहे. तुम्ही जर कधी अंदमानला गेला असाल तर माऊंट हेरिएटकडे जाताना ही जागा तुम्हाला दिसते.



१०० रुपयाची नोट

१०० रुपयाच्या नोटेमागे आपल्याला दिसतात, त्या आहेत हिमालयीन पर्वत रांगा. हिमालयाच्या भव्य पर्वतरांगा आणि सुंदर बर्फाच्छादित शिखरं यांचं दर्शन आपल्याला १०० च्या नोटेतून घडतं.

गुलाबी नोटेवर ‘मंगळ यान’

नोटबंदीनंतर मोठ्याप्रमाणावर चलनात आली गुलाबी-जांभळ्या रंगाची २००० रुपयाची नोट. २००० रुपयाच्या पाठीमागील बाजूला आपल्याला मंगळयान पाहायला मिळतं. भारत देशाने अंतराळात सोडलेले हे पहिले-वहिले ‘मंगळयान’ आहे.

First Published on: June 18, 2018 3:09 PM
Exit mobile version