निसर्गाच्या सहवासात किफायतशीर किंमतीत घरं

निसर्गाच्या सहवासात किफायतशीर किंमतीत घरं

माथेरानच्या तळाशी असलेले नेरळ हे स्थानक पूर्वी सेकंड होम्ससाठी प्रसिध्द होते टूमदार बंगले हिरवाईने वेढलेली टूमदार शेतघरे हे नेरळचे वैशिष्टय मानले जात होते शनिवार रविवारचा विकेन्ड अथवा दिवाळी मे महिन्याच्या सुट्टीत नेरळला मुंबई ठाण्यातील पर्यटकांची वर्दळ असायची. आताही कमी झालेली नाही. मात्र सेकंड होम्सच्या या निवांत शहरात विकासाचे वारे वेगाने वाहू लागले आहेत बंगल्यावजा घरांच्या जागी बहुमजली अपार्टमेंट टॉवर्स उभे राहू लागले आहेत. नरेळ बरोबरच शेलू भिवपुरी रोड कर्जत येथे राहण्याचा पर्याय कनिष्ठ मध्यमवर्गीय स्वीकारू लागले आहेत. कर्जत भिवपुरी रोड परिसर नवे शैक्षणिक केंद्र म्हणून विकसीत होत आहे अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये या परिसरात आहेत मॉल संस्कृती अंबरनाथ बदलापूरपय्रंत येऊन ठेपली आहे त्यामुळे नेरळपर्यंत पोहचण्यास वेळ लागणार नाही. मुंबई ठाण्यातील मालमत्तांना आता सोन्याचा भाव आला आहे. मोक्याच्या जागी असलेल्या सदनिका कोटयावधी रूपयांना विकून दूरवरच्या ठिकाणी कितीतरी स्वस्त आणि प्रशस्त घरे घेण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. असेही ग्राहक अनेक आहेत. त्यामुळे नेरळ कर्जत पट्टयात नवे महानगर वसू लागले आहे. कर्जत परिसरात बाणगंगा प्रकल्प मार्गी लागला आहे त्यामुळे नव्याने वसणा- या शहरांना पुरेसा पाणी पुरवठयाची हमी आहे. कल्याण बदलापूरनंतर नेरळ हे निवासी घरांसाठी सर्वात मोठी मागणी असलेलं ठिकाण आहे माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आणि निसर्गसोंदर्याने नटलेल्या नेरळमध्ये घर घेण्यास ग्राहक उत्सूक असतो. मुंबईला जोडला गेलेला रेल्वे मार्ग हेच एकमेव कारण आहे.

आजच्या घडीला बदलापूर, कर्जत, अंबरनाथ आणि नेरळसारख्या परिसरात गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. माथेरान व्हॅलीत येणारा नेरळचा परिसर इतर नव्या ठिकाणांप्रमाणेच हळुहळू विकसीत होतोय. येथील जागेच्या किमती मुंबई उपनगर आणि नवी मुंबईच्या तुलनेत अनेक पटींनी स्वस्त असल्याने इथले प्रोजेक्ट्स आणि त्यात उपलब्ध होणारी घरंही तुलनात्मकरीत्या स्वस्त आहेत. त्यामुळे सामान्य मध्यमवर्गीय ग्राहकाला इथली गुंतवणूक सोयीची ठरत आहे. नेरळ हे पूर्वी वीकेण्ड होम डेस्टीनेशनसाठी अत्यंत लोकप्रिय होते. अर्थात ते आजही असले, तरी झपाट्याने होणार्‍या शहरीकरणामुळे या भागाकडे आता ग्राहक र्फस्ट होमचा ऑप्शन म्हणूनही पाहू लागले आहेत. यांत मुख्य बाब आहे, ती म्हणजे इथले जागेचे दर मुंबई परिसराच्या तुलनेत अत्यंत वाजवी आहेत. मुंबई उपनगर किंवा नवी मुंबई विकसीत होत असताना ज्याप्रमाणे लोकांनी त्यावेळच्या तुलनेत अत्यंत स्वस्त किंमतींमध्ये जागा घेतली होती तशीच संधी आता नेरळसारख्या ठिकाणांच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध होत आहे.

नेरळ रेल्वे मार्ग आणि नेरळ माथेरान रोडद्वारे इथे दीड ते दोन तासांत मुंबईहून पोहचणे सहज शक्य होते. कर्जत, पनवेल, रायगड परिसरात अनेक मोठ्या इंडस्ट्रीज तर आहेतच; पण त्याचबरोबर एन.डी.स्टुडीओ सारखे अनेक स्टुडीओ येथे तयार होत असल्याने शुटींगच्या व्यवसायातील अनेकजण येथे स्थलांतरीत होत आहेत. अनेक अंतरराष्ट्रीय हॉटेल्स, शाळा-कॉलेजेस, हॉस्पीटल्स, आयटी पार्क या परिसरात उभे राहात असल्यामुळे भविष्यात इथला चेहरामोहराच बदलणार आहे. सहाजिकच त्याचा नेरळसारख्या नजिकच्या एरियाला नक्कीच लाभ मिळू शकेल. एमएमआरडीए या भागांत अनेक विकासकामे हाती घेत आहे त्यामुळे नजीकच्या काळात इथल्या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावून त्याचा प्रॉपर्टी मार्केटला महत्वाचा हातभार लागणार आहे. एका दर्जेदार राहणीमानासाठी आवश्यक असणार्‍या सर्व सोयी सुविधा नेरळमध्ये ग्राहकांना उपलब्ध आहेत. हा परिसर इको सेंसेटिव्ह झोनमध्ये येत असल्याने माथेरान व्हॅलीमधल्या असीम निसर्गाचा मनसोक्त आनंद उपभोगता येणार आहे. उल्हास नदीमुळे येथे मुबलक पाणी आहे. शिवाय खोपोली, अंबरनाथ, कर्जत इथल्या एमआयडीसीमुळे या भागातील स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल. चांगल्या गुंतवणूकीसाठी लागणारे सर्वप्रकारचे पोषक वातावरण आज नेरळमध्ये उपलब्ध आहेत. भविष्यात होणार्‍या विकासकामांबरोबरच येथे अनेक दजेर्दार रेसिडेंन्शिअल प्रोजेक्ट्स सुरू आहेत. यांतील बरेचसे प्रोजेक्ट्स तर पूर्णही झाले असून, नेरळ हाईटस जिते कुंबळे गावात बंगल्याचे प्रोजेक्ट आहेत. ऑलेम्पीया प्रोजेक्ट, नंदादीप प्रेाजेक्ट द डेस्टीनेशनचे १२० एकरच्या जागेत बंगल्याचे प्रोजेक्ट साकारण्यात आले आहे. याठिकाणी वन बीएचके, टू बीएचके बंगले आहेत. हावरे मेडोज चे प्रोजेक्ट सुरू आहेत.त्यामुळे घरांबरोबरच सेकंड होमसाठीही अनेकांची नेरळ माथेरानला पसंती मिळत आहे.

First Published on: October 6, 2018 6:01 AM
Exit mobile version