उच्च रक्तदाब टाळण्यासाठी करावे ‘हे’ उपाय

उच्च रक्तदाब टाळण्यासाठी करावे ‘हे’ उपाय

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब हा सध्याच्या तरूणाईसाठी सर्वात महत्त्वाचा धोका आहे. एका विशिष्ट वयात उच्च रक्तदाबाचा त्रास हा सुरु होतोच. पण सध्या तरूणाईमध्ये हा त्रास जास्त दिसायला लागला आहे. पुरुषांमध्ये ९० टक्के हा त्रास जाणवत असून महिलांमध्ये ५५ ते ६० टक्के उच्च रक्तदाबाचा त्रास दिसून येतो. उच्च रक्तदाबामुळे ह्रदविकाराचे प्रमाण वाढले आहे. उच्च रक्तदाबामध्ये ह्रदयावर जास्त दबाव येतो आणि त्याचा परिणाम मृत्यूमध्ये परावर्तित होतो. त्यामुळे उच्च रक्तदाब टाळण्यासाठी आपण जाणून घेऊयात ‘हे’ उपाय –

१. योग्य आहार घ्यावा –
तुमचा रक्तदाब नीट राहावा आणि ह्रदयावर कोणताही दबाव येऊ नये यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. फळे, भाज्या, प्रथिनयुक्त पदार्थ, चरबी विरहीत उत्पादने आपल्या रोजच्या आहारात वापरावीत. मीठ आणि साखरेचा आपल्या आहारातील अधिक वापर टाळावा. उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांनी मीठ कमी खाणेच योग्य.

२) वजनावर नियंत्रण ठेवा –
तुमच्या उंचीनुसार वजन नियंत्रणात ठेवा. जसजसे तुमचे वजन वाढते, त्याप्रमाणे तुमचा रक्तदाबदेखील वाढतो. वजन घटवून तुम्ही रक्तदाबाच्या त्रासापासून दूर राहू शकता. थोडे जरी वजन कमी केले तरी तुम्हाला स्वतःला बदल जाणवू शकतो.

३) शारीरिक हालचाली करत राहा –
तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी शारीरिक हालचाली करत राहणं गरजेचे आहे. यामुळे तुमचे वजनदेखील नियंत्रणात राहू शकते. तुमच्या ह्रदयावर येणारा दबाव आणि तणाव यामुळे कमी होण्यास मदत होते. रोज किमान अर्धा तास चालणे आवश्यक असून सायकलिंग, धावणे, नृत्य हेदेखील तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करते.

४) तंबाखू सेवन टाळा –
उच्च रक्तदाबासाठी धुम्रपान करणे हा सर्वात मोठा धोका आहे. तुम्ही सिगारेटचे जितके झुरके ओढाल तितका तुमचा रक्तदाब अधिक वाढत जातो ज्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराला धोका उद्भवतो. तंबाखूचा कोणताही प्रकार सेवन करणे हे उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे तंबाखूचे कोणत्याही प्रकारचे सेवन टाळणे योग्य.

५) दारू पिणे टाळा –
दारूचे अतिसेवन हे उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरते. एका वेळी तीनपेक्षा अधिक ग्लास दारू पिणे हे उच्च रक्तदाबाला आमंत्रण देते. उच्च रक्तदाब असल्यास, दारू पिणे टाळा.

First Published on: May 17, 2018 10:49 AM
Exit mobile version