‘या’ देशांमध्ये वापरलं जातं भारतीय चलन !

‘या’ देशांमध्ये वापरलं जातं भारतीय चलन !

भारतीय चलन

परकीय चलनांच्या तुलनेत भारतीय रुपया जास्त मजबूत आहे. जगातील ८ देशांमध्ये भारतीय चलन वापरलं जातं. भारतीय रुपयासह जगभरात प्रवास करता येण्यासारख्या ‘या’ सुंदर ठिकाणांचाही आपल्या यादीत समावेश करता येईल. जाणून घ्या ‘त्या’ देशांबाबत…

बेलारूस

बेलारूस हा देश एका अर्थाने युरोपचे एक रत्न आहे. उर्वरित खंडापैकी दूर बेलारूसला युरोपियन संघापासून अलिप्त असल्याचा त्याला अभिमान आहे. साधी पण श्वास रोखणारी भूदृश्यं, नयनरम्य गावं आणि शहरं यांच्या माध्यमातून युरोपच्या शुद्ध स्वरूपाचा अनुभव घेता येतो. बेलारूसचा अनुभव घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तेथील विशिष्ट वनस्पती आणि त्या प्रदेशातील प्राणी हे आहेत.

व्हिएतनाम

व्हिएतनाम हा देश सर्वस्वी ग्रामीण प्रवास, हिरवेगार पाणी, सुंदर बेटे आणि जुन्या शहरातून मोकळ्या हवेतले जलपर्यटन म्हणून ओळखलं जातं. श्वास रोखून धरणारी नैसर्गिक आश्चर्ये आणि विशिष्ट वारसा ही या देशाची खासियत आहे. फ्रेंच स्थापत्याशास्त्र आणि युद्धाशी निगडीत संग्रहालये अशा शीर्ष आकर्षणे आपणास या देशाचा इतिहास समजून घेण्यास मदत करतात. व्हिएतनामच्या सौंदर्याचा अमुराद आनंद घेण्यासाठी पुरेसे परकीय चलन हाताशी ठेवायला विसरू नका.

आइसलँड

आइसलँड म्हणजे नैसर्गिक सौंदर्यानी नटलेली भूदृश्ये आणि उत्तरेला चमकणाऱ्या नैसर्गिक दिव्यांची रोषणाई! येथील उत्तरेकडील अप्रतिम सौंदर्य हे निसर्गप्रेमींना चकित करण्यास पुरेसे आहे. आइसलँडच्या या सौंदर्यात वाहताना मात्र आपल्या खिशाला थोडाही चिमटा पडत नाही ! एक आइसलँडिक क्रोना फक्त ०.५९ रुपये आहे.

श्रीलंका

हिंदी महासागराने वेढलेली, मोहक आणि जादुची नागरी म्हणजे श्रीलंका! येथील अतुल्य समुद्रकिनारे म्हणजे समुद्राप्रेमिंसाठी जणू नंदनवनच आहेत. निर्जन खंड, स्वागतप्रेमी लोक आणि सुंदर वन्यजीवन हे देशाचे वैशिष्ट्य आहे. हिंदी महासागरातील मोत्याप्रमाणे असणारा श्रीलंका जगातील नयनरम्य देशांपैकी एक आहे.

पराग्वे

पराग्वे या जुन्या शहराची मोहिनी आपणास भुरळ घालते. हे कमी गर्दीचे, कमी ज्ञात असलेले आणि तरीही सुंदर असे शहर आहे. बरेच प्रवासी पराग्वेकडे दुर्लक्ष करतात. मात्र यामुळे ते विलक्षण अशा दक्षिण अमेरिकेचा अनुभव गमावत आहेत.

चिली

चिलीचे मूळ सौंदर्य म्हणजे उंचच उंच शिखरं आणि त्यामधून उगम पावणाऱ्या नद्या यांचा संगम जे तुम्ही इतरत्र कुठेच पहिले नसेल. हे डोंगराळ शहर आहे, जिथे आपण पाऊल ठेवले तर आपले हृदय येथे स्थायिक होईल आणि पुन्हा परत येण्यास नकार देईल. चिलीला भेट देणे आपल्याला परवडण्यासारखे आहे, कारण एका चिलीयन पेसोची किंमत केवळ ०.१० रुपये इतकी आहे.

नेपाळ

नेपाळ हे पर्वतांच्या कुशीत वसलेले शांततेचे प्रतीक आहे. हे एक असे स्थान आहे जे आपण घेत असलेल्या प्रत्येक पावलासह अधिकच उत्कंठा वाढवत जाते. आपण कमीत कमी खर्चात नेपाळच्या भव्यतेचा आनंद घेऊ शकता.

कंबोडिया

मनमोहक मंदिरे आणि अद्भुत कलाकृती यांचे दुसरे नाव म्हणजे कंबोडिया! जंगल आणि धबधबे आपल्याला खात्रीने कंबोडियाच्या प्रेमात पडतात. कंबोडियाच्या वैविध्यपूर्ण इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी परवडणाऱ्या कंबोडियाला नक्की भेट द्या, कारण कम्बोडियन रीलची किंमत फक्त ०.०१७ रुपये आहे.

First Published on: June 8, 2018 8:16 AM
Exit mobile version