जीन्सला पर्याय लेगिंग्सचा

जीन्सला पर्याय लेगिंग्सचा

प्रातिनिधिक फोटो

पावसाळ्यात जीन्स भिजली की, ती वाळेपर्यंत अगदी नकोसे होते. विशेषत: कामाच्या ठिकाणी अशा ओल्या जीन्समध्ये काम करणे कठीण जाते. कारण एसीमध्ये जीन्स वाळत नाही आणि जीन्स ओल्या राहिल्या की,त्यांना एक कोंदट वास येतो. त्यामुळे तो संपूर्ण दिवस ती ओली जीन्स वाळवण्यात जातो. अशावेळी लेगिंग्स हा जीन्सला बेस्ट ऑप्शन आहे. पण कुर्तीवर वापरतो त्या या टिपिकल लेगिंग्स नाहीत तर सध्या अशा लेंगिग्स मिळतात, ज्या तुम्ही इंडो वेस्टर्न कोणत्याही आऊटफिटवर घालू शकता. विशेष म्हणजे पावसात त्या भिजल्या तरी झटपट वाळतात. काही वर्षांपूर्वी आलेल्या जेगिंग्स या प्रकाराचे हे अपग्रेडेट र्व्हजन आहे, असचं काहीसं म्हणायला हवं.

वेस्ट बँड सॉलिड लेगिंग्स

या लेगिंग्स अगदी जीन्स सारख्याच दिसतात. हायवेस्टेड प्रकारच्या या लेगिंग्सच्या कमरेकडील इलास्टिक रुंद असते. सीमलेस प्रकारची ही पँट असल्यामुळे तिचा फिल एकदम छान असतो. या पँटसवर क्रॉप टॉप किंवा टक इन शर्टस चांगले दिसू शकतात. त्यामुळे फॉर्मल आणि कॅझ्युअल असे दोन्ही लूक तुम्ही कॅरी करु शकता.

रेग्युलर लेगिंग्स

अँकल लेंथ अशा या लेंगिग्स प्लेन असतात. या लेंगिग्सची फिटींग कुडतीवरच्या लेगिंग्सपेक्षा वेगळी असते. त्यामुळे इंडो- वेस्टर्न अशा कोणत्याही टॉपवर तुम्ही त्या घालू शकता.

बेडिंग लेंगिग्स

डिझायनर लूक देणारा हा लेगिंग्सचा प्रकार आहे. कारण यावर थोडंफार वर्क केलेले असते. म्हणजे मोती, स्पार्कल्स टिकल्या त्यावर अरेंज केलेल्या असतात. लेगिंगसच्या गुडघ्यापासून ते बॉटम पर्यंत हे वर्क असते. त्यामुळे या लेंगिग्स तुम्ही नी लेंथ पर्यंतच्या टॉपसवर घालू शकता.

फॉर्मल लूक लेगिंग्स

फॉर्मल लूक देणार्‍या प्रिंटमधील लेगिंग्सदेखील सध्या अनेक ठिकाणी मिळतात. चेक्स, लाईन प्रिंटमधल्या या पँट तुम्ही फॉर्मल शर्टवर घालू शकतात. या पँटसची फिटींग लेगिंग्ससारखी वाटत नाही. त्यामुळे या लेगिंग्स ही सध्या अनेक जणी वापरताना दिसतात.

कॅमो प्रिंट लेगिंग्स

तुम्हाला स्पोर्टी लूक आवडत असेल तर या लेंगिग्स तुमच्यासाठी बेस्ट चॉईस आहेत. कारण मिलटरी, अ‍ॅनिमल प्रिंटमध्ये या लेंगिग्स असतात. प्लेन लाँग टि शर्टवर हे लेगिंग्स चांगले दिसतात. पण ऑफिससाठी अशा प्रकारचे लेगिंग्स घालणे टाळा.
लेगिंग्स कॉटन आणि स्पेंडेक्स मिक्स मटेरिअलमध्ये या लेगिंग्स मिळतात पारदर्शक लेगिंग्स घेऊ नका. कारण शॉर्ट टॉपवर त्या चांगल्या दिसत नाहीत. बाजारात अनेक चांगल्या ब्रँडसचे लेगिंग्स आहेत ते घ्या.

महत्वाचा सल्ला 

लेगिंग्स शरीराला घट्ट बसेल अशा लेगिंग्स घेताना त्यामुळे तुमच्या त्वचेला काही त्रास होत नाही ना हे देखील पहा. कारण स्किनटाईट लेगिंग्समुळे तुम्हाला रॅश येऊ शकतात. त्यामुळे सैल लेगिंग्स निवडा.लेगिंग्सचे वेगवेगळे प्रकार ट्राय करताना तुम्हाला नेमका कोणता लूक कॅरी करायचा आहे त्या नुसार लेगिंग्सची निवड करा. सगळ्या प्रकारच्या लेगिंग्समध्ये रंगाचे खूप पर्याय आहेत. हे रंग निवडतानाही काळजी घ्या. लाईट कलर या सीझनमध्ये निवडणे हा नक्कीच गूड चॉईस नसेल.

First Published on: July 14, 2018 6:30 AM
Exit mobile version