पुरुष जन्मा ही तुझी कहाणी

पुरुष जन्मा ही तुझी कहाणी

Birth

एखाद्या पुरषाने ओळख करून घेण्यासाठी पुढाकार घेणं, क्वचित काही चेष्टा करणं हे गैरअर्थाने पाहून त्यांना लगेच झापायला घेणार्‍या स्त्रिया पाहून हे असं का होतं? हा प्रश्नं नेहमी मनास पडतो. स्त्री मोकळी ढाकळी वागली व्यक्त झाली की त्याचे कौतुक होते अनेकदा. बावळटासारखे तिला बोल्डबिल्डही म्हणतात. पण पुरषाने मात्र साधं एखाद्या स्त्रीशी जरा बर्‍यापैकी संवाद असेल, थोडीफार जानपेहचान असेल तर तिच्या फोटोवर ती सुंदर दिसतेय, डोळे मादक वाटतात, ती सेक्सी दिसतेय, तिची साडी वंटास दिसतेय, ती तिला खुलून दिसतेय, असं म्हणणं इतकं का खटकतं? ते न खटकणं म्हणजे पुरषांच्या चिपंडूगिरीला बढावा देणं, हे कसं काय बुवा?

एखाद्या स्त्रीबाबत मनापासून प्रशंसापर काही बोलावे वाटले तर त्यांना त्या आधी शंभर वेळा विचार करावा लागतो, हे चित्र फारसे स्तुत्य नाही. ही काही मला स्त्रियांची जरब वगैरे वाटत नाही. पुरुषाची प्रशंसा करणार्‍या स्त्रियांना गळेपडू म्हटलं जातं. पण स्त्रियांची प्रशंसा करणार्‍या पुरषांना लाळघोटे ठरवून त्यांना लगेच तासायला घेणं हे जाम बोअर आहे. कायच्या काय बोअर. एखादा पुरुष बोलायला आला की त्याच्या मनात ’ तसे ’ च काहीतरी आहे, हे ठरवूनच टाकणं… जा जरा जगा यार.. बरं हे आवडत नसेल तरही ठीक आहे. पण उठा की लगेच करा अपमान पुरषाचा आणि मग आपण कसे रानटी मैना आहोत वगैरे किंवा कश्या चांगल्या वळणाच्या आहो वगैरे.. एवढ्या तेवढ्याने विनयभंग की काय तो विणयभंग लगेच होतो बायांचा तर मग एक पाटीच लाऊन ठेवायची जिथे तिथे, मला सेक्सी, सुंदर, लाजवाब, अप्रतिम, टवका वगैरे म्हणू नये… लगेच ’ ए भडव्या ’ असं म्हणून खवडा देण्यात येईल इ.

पुरषांचे हालच आहेत एकुणात. एका एका माणसाने एका स्त्रीच्या साडीवरील फोटोवर प्रशंसा केली होती. साडीचा पदर सुंदर आहे, इतकच तो म्हणाला तर करंगळी दिली तर हात धरतात लोक्स प्रमाणे पदराचं टोक धरून आता हे चालले ब्लौझ धरायला.. इतपत निष्कर्ष काढून त्या दोन पोरांच्या आईने त्या इसमाची आईबहीण काढली. दादा रडू लागले.. त्यांनी गयावया केली. मग बाकीची माणसंही चढ चढ चढली. ते दादा स्वारी स्वारी म्हणून रड रड रडले पण शेंबूड पुसायला त्यांना पदराचं टोक काय एक साधा रूमालही कुण्णीच ऑफर केला नाही. थोडक्यात काय बाई म्हणते ती पूर्वदिशा. पुरष जन्मा ही तुझी कहाणी.

मी पण बर्‍याच पुरषांना झापलंय. पण उग्गा घे की बडव.. ह्या. आपल्याला पाहिजे अगदी तसच समोरचा प्रशंसा करताना व्यक्त झाला पाहिजे, त्याने आपल्याला आवडेल रूचेल असंच नेहमी बोललं पाहिजे, असले काही गोंधळ सुदैवाने अद्याप डोस्क्यात नैयेत.

एखाद्या तरुण मुलाने क्वचित सेक्सी दिसतेस, अहाहा इ. लिहले बोलले तरी कळी आतून जरा खुलतेच पण हेच जर एखाद्या पन्नाशी पार पुरषाने बोलले की आचरट, नालायक, भाडखाऊ, भडवा, गांडू, लोचट, हरामी, वुमनायझर… अरारारारा. कबूल करलो हम शेरनी नही अंदरसे मेंढक है.

– रेणुका खोत

First Published on: October 21, 2018 12:13 AM
Exit mobile version