दिवाळी बोनस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!

दिवाळी बोनस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!

डॉ. जितेंद्र आव्हाड

ब्रिटिश काळात भारतातील कामगारांना गुरा-ढोराप्रमाणे वागणूक मिळत होती. कामगारांना 12-12 तास काम करावे लागत असे. एवढे काम करून सुद्धा भारतीय कामगारांना योग्य ती वागणूक मिळत नव्हती.

ब्रिटिश काळात भारतीय कामगारांना मालकाकडून प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची पद्धत होती. इंग्रजांच्या आठवड्याच्या पगार नियमानुसार एका वर्षात 52 आठवडे होत असे आणि त्याप्रमाणे कामगारांना पगार मिळत असे.

इंग्रजांच्या पगार नियमानुसार चार आठवड्यांचा “एक” महिना धरला असता एका वर्षात 13 पगार मिळायलाच हवे होते, पण असं न होता एका वर्षात फक्त 12 पगारच मिळत असे. ही बाब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारशी पत्रव्यवहार करून ह्या सर्व गोष्टींची जाणीव करून दिली. जर 13वा पगार म्हणजे आताचा आपण ज्याला “बोनस” म्हणतो ते नाही मिळाले, तर आंदोलन करू, असाही इशारा त्या पत्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिश सरकारला दिला.

त्यानंतर ब्रिटिश सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्राची दखल घेत, कामगारांना 13 पगार म्हणजे आताच “बोनस” कसा देता येईल, यावर विचार केला गेला, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिश सरकारला काही सूचना दिल्या. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे सुचविले की, भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे “दिवाळी”; तर 13वा पगार म्हणजेच “बोनस” दिवाळीलाच देण्यात यावा. त्यांच्या पत्राचा विचार करून ब्रिटिश सरकारने 30 जून 1940 साली भारतात “बोनस” हा कायदा लागू झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठल्याही एका जातीसाठी किंवा धर्मासाठी कार्य न करता सर्व भारतीयांसाठी मोठा लढा उभारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे आज आपल्याला दिवाळीचा “बोनस” मिळत आहे..!

(लेखक माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत)

First Published on: October 20, 2022 5:10 PM
Exit mobile version