Blog: ‘कंगणाबाई मुंबईत आहेस म्हणून सेफ आहेस, दिल्लीत रात्री फिरुन दाखव’

Blog: ‘कंगणाबाई मुंबईत आहेस म्हणून सेफ आहेस, दिल्लीत रात्री फिरुन दाखव’

कंगना रानौत

कंगणा रणावत. काही वर्षांपूर्वी उंच गोरेली, नखरेली, कुरळ्या केसांच्या या सनकी हिरोईनचा क्विन चित्रपट बघितला. चांगली नटी. पण आता हिला झालयं काय.
कानात वारा शिरल्यानंतर वासरू जसं इकडं तिकडं हुंदडतं. तस हीच झालंय. ही बया तोंडात येईल ते बडबडतेय. ती दिवसा पण पिते असं वाचलं होतं कुठेतरी.
पण ती न पिताही इतके बडबडते. सॉलीड आहे. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची धमक या हिमालयीन पोरीमध्ये आहे. असं वाटलं होतं.
त्यामुळे तिन ऋतिक प्रेम प्रकरणाचा पाडलेला किस अनेकांनी चवीने वाचला. कंगणा ताईच्या त्या लव्ह स्टोरीला मध्ये मध्ये तिची बहिण रंगोली फोडणी घालत होती.
शेवटी काही होत नाही म्हंटल्यावर बसल्या गप. पण शांत बसेल ती कंगणा कसली. हिमाचलचं पाणी शेवटी. त्याला खळखळाटच फार… लोकांची करमणूकही होतेच.
म्हणूनच टीआरपीसाठी काही चॅनेलवाल्यांनी मुलाखती घेतल्या बाईंच्या. बाईही तोंड फाटेपर्यंत ऋतिकवर बोलली…

पण तो गप्पचं. सगळं एकांगी… बाईच्या तोंडी फार कोणी लागत नाही. नंतरही अनेक जण कंगणाच्या निशाण्यावर होते. ती केव्हा कुठे आणि काय व कोणाबदद्ल बोलेल याचा नेम नाही.
त्यामुळे बॉलीवूडकर तिच्याशी फटकूनच असतात. कोणीही तिच्याबरोबर काम करण्यास तयार होत नाही. परिणामी बॉलीवूडच्या खानदानात कंगणा तशी एकटीच. बाकी बाई हुशार…
पण नको तेवढी वाचाळ… बिनबुडाचं जास्त बोलंण. सुशांत प्रकरणामुळे तर ती अधिकच चेकाळली. सगळ्यांवर आरोप करून झाले. यामुळे ती धडाडीची वाटली.
पण पत्रकारांपासून ते ज्या बॉलीवूडने तिला बरच काही दिलं त्यांनाही ती नावं ठेवते. तिला सगळेच का वाईट आहेत असं वाटतं. ती तेवढी सोज्वळ बाकी सब गुंडे. हे काही रुचत नाही बुवा.

सुशांत सगळ्यांचाच आवडताय. त्याला न्याय मिळालाच पाहीजे. पण आता जे काही चाललं आहे. त्यात कंगणाने जो पुढाकार घेत राजकारणाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
ते पाहता येत्या निवडणूकांत ती हिमाचलमधून कमळाच्या वर्षावात उभी राहू शकते, असं वाटायलां लागलंय. असो त्या राजकारणात काही पडत नाही.
पण बाई आमच्या मुंबईला बोलायचं तुझं काम नाही. येथे बाकीचे येतात तशी आलीस पैसे कमावलेस नाव कमावलसं आणि आता काय तर मुंबई पाकव्याप्त…
येथेच गमावलंस बाई मुंबईकरांच प्रेम… मुंबईत आहेस म्हणून सेफ आहेस… रात्री बेरात्री शूटींगसाठी भटकतेस ना मुंबईच्या रस्त्यावरून ते फक्त मुंबई पोलिसांच्या जीवावर…
दिल्लीत नाहीतर तुझ्याच मनालीमध्ये फिरुन दाखव मध्यरात्री… बाप आहे मुंबई सगळ्यांची… आणि बापाच्याच सावलीत मुली सेफ असतात. विचार तुझ्या…

First Published on: September 5, 2020 7:45 PM
Exit mobile version