कांदापात कापणी यंत्राची कमाल…

कांदापात कापणी यंत्राची कमाल…

प्रसन्न प्रदेशी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शिराढोण गावचा, शालेय शिक्षण झालं शासकीय विद्यानिकेतनमध्ये, पुरणमल लाहोटी लातुरमध्ये डिप्लोमा, उस्मानाबादला बी.ई. प्रोडक्शन. त्यानंतर पुण्याच्या कंपनीमध्ये सोळा वर्ष नोकरी केली, त्यांच्याच अमेरिकेच्या कंपनीमध्ये साधारण आठ वर्षं काम बघितलं. चोवीस पंचवीस वर्षे नोकरी झाल्यानंतर राजीनामा देऊन स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा त्या विचाराने भारतात परत आला.

नोकरी दरम्यान शेतीची आवड असल्यामुळे मनमाडच्या जवळ भाऊजी राजेश मिसर यांच्या मदतीने टप्प्याटप्प्याने शेतजमीन खरेदी केली. यादरम्यान असं लक्षात आलं की शेती अजूनही जुन्या पद्धतीने जुनी यंत्र वापरून खुरपे, विळे, विळी या ह्या पद्धतीने शेती होत आहे आणि यात नवीन तंत्रज्ञान नवीन मशिनरी नवीन टूल्स यांची खूप गरज आहे. शेती व्यतिरिक्त बाकी क्षेत्रात टेक्नॉलॉजीचा भरपूर प्रसार आणि प्रचार झाला आणि वापर पण सुरू झाला पण भारतातील शेती ह्या बाबतीमध्ये मागे राहिलेली आढळली. मी पाहिलं की बाया अजूनही विळीवर हातांनी एक एक कांदा कापतात. एका एकरामध्ये अडीच लाख कांदे असतात. हे पाहिल्यावर माझ्या मनात विचार आला की यावर आपण काहीतरी करायला पाहिजे. आपण अभियांत्रिकीचे ज्ञान, आपल्याला मिळालेला अनुभव याचा वापर करून शेतकर्‍यांसाठी नवीन यंत्र तेही कमी खर्चात विकसित करायला पाहिजे.

साधारणता दोन महिने वेगवेगळे प्रयोग केल्यानंतर आणि शेतीत जाऊन ट्रायल घेतल्यानंतर कांदा कापणी यंत्र तयार झालं. हे यंत्र 1 जानेवारी 2020 लासलगाव, मनमाड, येवला या मार्केटमध्ये लाँच केलं. सखा कांदा कापणी यंत्राला शेतकर्‍यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हे यंत्र बॅटरी वरती चालणारा आहे. या यंत्रावर ती दोन माणसं एका वेळेला काम करू शकतात आणि त्यांचा हात साफ झाल्यानंतर दिवसभरात 15 ते 20 क्विंटल कांदा सहज कापू शकतात. या यंत्राचा वापर उन्हाळ कांदा जो आहे त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. एका दिवसात करण त्याला मुळे कापायची नसतात.

या यंत्रावर उन्हाळ कांदा कापायचं झाल्यास दिवसभरामध्ये दोन माणसं साधारण 30 ते 40 क्विंटल सहज कापू शकतात. या यंत्राचा वापर शेतकर्‍यांनी एक एकर कांदा कापण्यासाठी केला तर त्याची किंमत वसूल होऊन जाते एका. एकराच्या वापरात त्यांच्या मजुरीची जी बचत होते त्यात ती ह्या यंत्राच्या किमतीपेक्षा जास्त आहे. हे यंत्र वापरायला सोपे, वजनाला हलके, बॅटरीसहित आणि बॅटरी विरहित असे मॉडेलमध्ये उपलब्ध केले आहे. हे यंत्र 12 वोल्ट बॅटरीवर चालते, विजेवर चालते, फवारणी पंपावर चालते.

सखा कांदा कापणी यंत्राला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आम्ही फळबाग छाटणी यंत्र विकसित केले. हे यंत्र 12 ओल्डच्या दोन बॅटरीवरती चालते. हे यंत्र एक ते दोन सेकंदात एक इंचापर्यंतची फांदी सहज कापते. सखा फळबाग छोटी यंत्र वापरल्याने एका झाडाची छाटणी एक ते दोन मिनिटात पूर्ण होते. या यंत्राचा वापर केल्याने एक मजूर एका दिवसात एक एकर फळबाग छाटणी पूर्ण करू शकतो. याद्वारे होणार्‍या बचतीमध्ये यंत्राची किंमत वसूल होते. सखा ग्रो नि विकसित केलेले ट्रिमर नावाचे यंत्र हे शेतकर्‍यांच्या खूप उपयोगी येत आहे. हे यंत्र फवारणी पंपाला जोडून वापरता येते याद्वारे बांधावरचे गवत शेंडे खुडणी झुडपे कापणे ही कामे न वाकता करता येतात. या संशोधनामध्ये त्यांच्या एपी एनर्जी सोल्युशन्स या कंपनीतील तांत्रिक संचालक अनिल सहस्त्रबुद्धे यांची खूप मदत होते.

नजीकच्या भविष्यात अशाच शेती उपयोगी यंत्रांवर संशोधन आणि काम चालू आहे. प्रसन्न परदेशींना वाटते की विदेशी यंत्रांच्या ऐवजी भारतातल्या कंपन्यांनी विकसित केलेले यंत्र हे भारतीय शेतीसाठी जास्त योग्य आहेत. तसेच अशी यंत्र विकसित करण्यासाठी भारतीय शेतकर्‍यांच्या मुलांनी आपली कल्पकता आणि हाताने काम केल्याचा अनुभव वापरून नवीन छोटी छोटी यंत्र विकसित करायला हवीत. जेणेकरून शेतकर्‍यांना मजूर न मिळण्याचा प्रश्न सुटेल व शेतीच्या खर्चात बचत होईल.

1) कांद्याची ओली पात लक्षात घेता गंजू नये म्हणून स्टेनलेस स्टीलचा टॉप आणि ब्लेड यात वापरले आहे.
2) हायस्पीड डीसी मोटर व 12 व्होल्टच्या लीड सिड बॅटरी वापरली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर आठ तासांपर्यंत वापर करता येतो.
3) ट्रॅक्टरच्या बॅटरीवरही संयंत्र वापरता येते. त्यावर एकापेक्षा अधिक संयंत्रे अधिक काळासाठी वापरता येतात.
4) थेट विजेची उपलब्धता असेल तर त्यासाठी ‘एसी टू डीसी कन्व्हर्टर’चा पर्याय उपलब्ध केला आहे. बॅटरी आणि चार्जरशिवाय, त्याच्यासह किंवा कन्व्हर्टरसह अशा वेगवेगळ्या स्वरुपामध्ये मागणीनुसार यंत्र उपलब्ध केले जाते.
5) ज्या शेतकर्‍यांकडे बॅटरी चलीत फवारणी यंत्र असेल, त्यांना त्या बॅटरीचा उपयोग कांदापात कापणी यंत्रासाठी करता येऊ शकतो.
6) संयंत्र बंद चालू करण्यासाठी स्वीच दिला आहे.

खर्चात व कष्टात बचत होते. एकरी 100 क्विंटल सरासरी उत्पादकता धरल्यास मजुरांमार्फत विळ्याचा वापर करून कांदापात कापायला सहा ते सात हजार रुपये खर्च होतात. तीन हजार रुपयांच्या यंत्राची एकदाच खरेदी केल्यास पुढे दरवर्षी मोठी बचत साध्य होऊ शकते. यातील ब्लेड दोन्ही बाजूंस फिरत असल्याने दोन्ही बाजूंनी कांदापात कापण्याचे काम दोन व्यक्तींच्या साह्याने करता येते. दुप्पट काम शक्य होते.

–राकेश बोरा 

First Published on: April 3, 2022 5:45 AM
Exit mobile version