उत्तुंग व्यक्तिमत्व सूरदासदादा गोवारी

उत्तुंग व्यक्तिमत्व सूरदासदादा गोवारी

माणसाला परिस्थिती घडवत असते. मुळात माणसाच्या संघर्षाचा काळ हा त्याचा खरा मार्गदर्शक असतो. कारण ती वेळ माणसाला संकटात संघर्ष करायला, लढायला शिकवते. यातून निर्माण झालेले व्यक्तिमत्व हे खर्‍या अर्थाने समाजाला दिशादर्शक ठरते. रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील असेच एक भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्रांचे नेते, कणखर सामाजिक माणूस, राष्ट्रवादीचे नेते, शिक्षणकर्मी, उत्तुंग व्यक्तिमत्व आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणजे सूरदासदादा गोवारी होय. प्रेमळ स्वभाव, सामाजिक दायित्व या गुणवैशिष्ट्यामुळे सूरदासदादांचे व्यक्तिमत्व आभाळाच्या उंचीचे झाले.

परिस्थिती कितीही बिकट असली तरी शून्यातून विश्व कसे निर्माण करायचे याचा आदर्श म्हणजे सूरदासदादा गोवारी आहेत. पनवेल तालुक्यातील कामोठे गावचे सूरदासदादा मूळ भूमिपुत्र आहेत. नवी मुंबई वसण्यापूर्वी येथील मूळ व्यवसाय हा शेती, मच्छीमारी, मिठागरे यांचा होता. आयुष्यभर कष्ट करण्याची येथील परंपरा. मात्र, या संघर्षाच्या काळात देखील सूरदासदादांनी शिक्षण पूर्ण केले. शेतीचे काम केलेच; पण रिक्षा आणि रूटिझमचे काम देखील केले. संघर्षाच्या काळात त्यांची जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि ध्येयवाद त्यांना यशाकडे घेऊन गेला. अंधाराला छेद देऊन प्रकाशाचा मार्ग शोधला.

एक यशस्वी उद्योजक म्हणून सूरदासदादांनी आपली ओळख निर्माण केली. संघर्षात देखील आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत ही शिकवण सूरदासदादांच्या व्यक्तिमत्त्वातून नक्कीच तरुणपिढीला मिळते. सामाजिक भान, सामाजिक जबाबदारी, सामाजिक जाणीव सूरदासदादांच्या कार्यात सातत्याने दिसते. समाजकारण करताना राजकारणात सक्रिय झाले. कामोठ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कमान हाती घेतली. पनवेल आणि रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या उभारणीत सूरदासदादांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय आहेत.

समाजकारण, राजकारण आणि व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरू असताना सूरदासदादांनी शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले. पनवेल तालुक्यातील आणि प्रामुख्याने कामोठे परिसरातील भूमिपुत्र शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या मुलांनी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेतले पाहिजे, ही सामाजिक भूमिका, सामाजिक जाणीव बाळगून सूरदासदादांनी कामोठे येथे डी. जी. गोवारी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज सुरू केले.

सूरदासदादांचा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास असाच अखंडपणे यशस्वी राहो, हीच त्यांना वाढदिवसानिमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा!

First Published on: August 5, 2020 5:05 PM
Exit mobile version