‘वर्कआऊट’ नंतर एनर्जी देणारी ड्रिंक्स

‘वर्कआऊट’ नंतर एनर्जी देणारी ड्रिंक्स

अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात वर्कआऊट अर्थात व्यायामाने करतात. वर्कआऊट झाल्यावर बहुतांशी लोक शरीरातील पाण्याची पातळी परत भरुन यावी आणि थकवा दूर व्हावा यासाठी हेल्दी ड्रिंक्स पितात. त्यातही बरेचजण मार्केटमध्ये मिळणारी टीन किंवा बाटल्यांमधील एनर्जी ड्रिंक्स घेतात. मात्र, अशाप्रकारच्या हवाबंद ड्रिंक्समध्ये प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स मिसळलेली असतात. तसंच या बाटलीबंद ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाणही भरपूर असते. शिवाय त्यातील काही पेयांमध्ये कृत्रिम रंग किंवा फ्लेवर मिसळले असण्याचाही धोका असतो. या सर्व गोष्टींमुळे आपल्या शरीराला थेट हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यायामानंतर प्यायची हेल्दी ड्रिंक्स तुम्ही घरच्या घरी बनवल्यास उत्तम. वर्कआउटनंतर घ्यायच्या एनर्जी ड्रिंक्सपैकी ही ड्रिंक्स तुम्ही सहज घरी बनवू शकता.

१. गाजराचा ज्यूस तुम्हाला तुमच्या दिवसाची उर्जात्मक सुरुवात करायची असल्यास व्यायामानंतर गाजर तसंच संत्र्याचा ज्यूस प्यावा. या दोन्हीमध्ये व्हिटॅमीन ‘ई’ आणि ‘सी’ मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटेल.


२. बनाना मिल्कशेक
 
केळं हे भरपूर उर्जा देणारं फळ आहे. केळ्यातून तुमच्या शरीराला दिवसभर पुरेल इतकी उर्जा मिळते. तसंत त्वचेच्या आरोग्यासाठीही केळं फायदेशीर असतं.


२. चॉकलेट शेक
 
–  चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे चॉकलेट प्रमाणात खाल्ल्यास त्यापासून शरीराला उर्जा मिळते. व्यायामादरम्यान तुमच्या कॅलरीज मोठ्याप्रमाणात बर्न होतात. त्यामुळे व्यायम केल्यानंतर अर्धा ग्लास चॉकलेट शेक प्यायल्यास तो लाभादायक ठरतो.

First Published on: July 18, 2018 6:10 PM
Exit mobile version