टॅटू झाले फॅशन सिम्बॉल

टॅटू झाले फॅशन सिम्बॉल

पूर्वीच्या काळात विशिष्ट संस्कृती म्हणून शरिरावर गोंदवले जायचे. मात्र, आता याच गोंदवण्याला आधुनिक काळात टॅटू या नावाने ओळखले जाते. सध्या युवा पिढीमध्ये टॅटूचा ट्रेंड अधिक प्रमाणात असून याची क्रेझ तरुणाईपासून ते महिलांपर्यंत सर्वांमध्येच वाढली आहे. आजकाल स्टाईलिश दिसण्यासाठी कपडे, फुटवेअर, मेकअप, एक्सेसरीज आणि हेअर स्टाईल हे सोडून टॅटू ही एक नवीन हटके फॅशन सध्या चर्चेत आहे.

आजकाल टॅटूची क्रेझ एवढी वाढली आहे की, कॉलेज, प्रवास आणि ऑफिसेसमध्ये पाहिले असता अर्धे अधिक लोकांनी टॅटू काढलेले असतात. सध्या टॅटू हा लोकांची इमेज निर्माण करतो, ती म्हणजे गिटार वाजवण्याचा छंद असतो अशा व्यक्ती टॅटूमध्ये गिटार काढतात. तर काहींना गणपती हे दैवत आवडत असल्यास काही व्यक्ती गणपतीचा देखील टॅटू काढतात. त्याचप्रमाणे काही तरुणी राशींच्या नावाचे देखील टॅटू काढतात आणि या टॅटूंची सध्या मोठ्या प्रमाणात क्रेझ असल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅटूंचे प्रकार

स्कल टॅटू, बाईक टॅटू, सेलिब्रेटी टॅटू, ट्रेडिशनल टॅटू, रियालिस्टिक टॅटू, थ्रीडी टॅटू, जापनिज टॅटू, बायो-मेकॅनिकल टॅटू, ब्लॅक आणि ग्रे टॅटू असे अनेक वेगवेगळे टॅटूचे प्रकार आहेत. हे टॅटूचे प्रकार तरुणांमध्ये जास्त प्रसिद्ध आहेत.
स्कल (कवटी) टॅटू – हा एक नवीन प्रकार प्रसिद्ध आहे. यामध्ये स्कलचे (कवटी) वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू काढले जातात. हा टॅटू रॉक बँड आणि कॉलेजच्या तरुणांमध्ये सर्वाधिक दिसून येतो.

बाईक टॅटू 

हल्ली मुलांना बुलेट आणि स्पोर्टस बाईक जास्त आवडतात. त्याचप्रमाणे जे राईडर्स असतात ते तरुण बाईक टॅटू काढताना दिसतात. तसेच या टॅटूमध्ये अनेक प्रकारांचा समावेश असतो.

 

 

सेलिब्रेटी टॅटू 

या टॅटूमध्ये आपल्या आवडत्या सेलिब्रेटीचा टॅटू काढला जातो. वेगवेगळ्या अभिनेता आणि अभिनेत्रींचे आपण टॅटू काढू शकतो.

 

 

 

ट्रेडिशनल टॅटू

या टॅटूमध्ये पक्षी, प्राणी आणि फुलांचा समावेश होतो. हे टॅटू जास्त करून मनगटावर काढले जातात. ज्या तरुणांना प्राणी पक्षांची आवड असते अशा व्यक्ती ट्रेडिशनल टॅटू काढतात.

 

 

 

                                             थ्रीडी टॅटू –

या टॅटूमध्ये कार्टूनचा समावेश असतो. प्रसिद्ध असलेले कार्टून कॅरेक्टर्स थ्रीडी टॅटूमध्ये येतात.

 

 

 

रियालिस्टिक टॅटू –

या टॅटूमध्ये रियलमध्ये घडलेले काही क्षण आणि आठवणी आपण या टॅटूमधून व्यक्त करु शकतो.

 

 

जापनिज टॅटू

– जापनिज टॅटूमध्ये मासे काढले जातात. यामध्ये जापनिज पद्धतीच डिझाईन असत.

 

 

 

बायो – मेकॅनिकल टॅटू

– हा टॅटू इंजिनिअरचे विद्यार्थी काढतात. या टॅटूमध्ये मशिनचे काही पार्ट यांचे हे टॅटू असतात. हे टॅटू दंडापासून हातापर्यंत काढले जातात.

 

 

 

ब्लॅक अ‍ॅन्ड ग्रे टॅटू

– हे टॅटू कलरफुल असून ते पूर्णपणे ब्लॅक अ‍ॅन्ड ग्रे टॅटूमध्ये असतात.

टॅटूची किंमत

टॅटूची किंमत ही त्या टॅटूच्या साईजनुसार ठरवली जाते. साधारणत: टॅटूची सुरुवातीची किंमत ही ५०० पासून सुरू होते. यामध्ये वेगवेगळ्या स्टाईलनुसार टॅटूच्या किंमती सांगितल्या जातात.

टॅटू काढण्याची पद्धत

टॅटू हा तीन लेअरमध्ये काढला जातो. हा टॅटू काढताना वेदना होतात. ज्यावेळी टॅटू काढतो त्यावेळी त्या ठिकाणी वेदना होत असल्यास टॅटू आर्टिस्ट दुसर्‍या बाजूने टॅटू काढण्यास सुरुवात करतो. जेणे करून त्या ठिकाणाच्या वेदना कमी होतात.

टॅटू स्टुडिओमध्येच काढावेत

सध्या टॅटूची क्रेझ वाढली आहे. मी गेली १२ वर्षे टॅटू काढत आहे. मात्र, सध्या ही फॅशन अधिक प्रमाणात वाढली आहे. यामुळे काही तरुण पिढी ही स्वस्तात टॅटू काढून मिळावा याकरता रस्त्यावर देखील काढून घेतात. मात्र ते शरिरास हानी पोहोचवणारे असतात. कारण रस्त्यावर वापरणार्‍या टॅटूची सुई आधी वापरलेली देखील असू शकते तर काही वेळा ती चांगल्या दर्जाची नसते. त्यामुळे केव्हा ही टॅटू काढताना स्टुडिओमध्ये काढणे गरजेचे असते. तसेच काहीवेळा असे तरुण येतात ज्यांना माहित नसते की सरकारी नोकरी हवी असल्यास त्या व्यक्तींने टॅटू काढू नये. कारण टॅटू काढलेल्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळत नाही. तर काही तरुण असे असतात जे आपल्या प्रियकराच्या नावाचे टॅटू काढतात. मात्र अशा तरुणांना आम्ही स्पष्ट विचारतो की तुम्ही त्या व्यक्तीशी लग्न करणार आहात ना. कारण तुम्ही एकदा काढलेला टॅटू पुसला जात नाही. त्यामुळे भविष्यात अडचण निर्माण होऊ शकते.

-दिपक वेताळ, लिलीज फाईन टॅटू आर्टिस्ट, घाटकोपर

 

प्रत्येक टॅटू आर्टिस्टची टॅटू काढण्याची वेगवेगळी पद्धत असते. मात्र, टॅटू हा तीन लेअरमध्ये काढला जातो. पहिल्या लेअरमध्ये आपल्याला हवा असलेला टॅटू मशिनच्या सहाय्याने ड्रॉ केला जातो. त्यानतर दुसर्‍या लेअरमध्ये त्या टॅटूमध्ये रंग भरले जातात आणि तिसर्‍या लेअरमध्ये फिनिशिंग केले जाते. अशी टॅटू काढण्याची पद्धत असते.

First Published on: July 28, 2018 5:00 AM
Exit mobile version