म्युच्युअल फंडबाबत तक्रारी कुठे करणार?

म्युच्युअल फंडबाबत तक्रारी कुठे करणार?

ग्राहक-संरक्षण कायदे, ग्राहक पंचायतसारख्या चळवळीने ग्राहक जागरूक होणे मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. शिवाय ग्लोबलायझेशन आणि बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे आजचा उत्पादक-सेवा पुरवठादार यांचा दृष्टीकोन व्यवहारिक झालेला आहे. आज उेाश्रिरळपीं ठशवीशीीरश्र डूीींशा म्हणजे ‘तक्रार निवारण कक्ष’ हवा असण्याची गरज कायद्याने आणि ग्राहक-सेवेचे एक ब्रीद म्हणून आवश्यक झालेले आहे. म्युच्युुअल फंडसारख्या गुंतवणूक साधनांबाबत कशा प्रकारच्या तक्रारी उद्भवतात आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी काय करायचे? हे आपण पाहणार आहोत.

जिथे जिथे ग्राहक असतो, मग ते उत्पादन-क्षेत्र असो की सेवा-उद्योग, यात गुणवत्ता हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. कारण उेर्पीीाशी डरींळीषरलींळेप – ग्राहक-समाधान हा अत्यंत महत्त्वाचा घटक झालेला आहे की, ज्यावर तुमची विक्री-सेवा आणि नफाइतकेच नव्हे तर अस्तित्वच अवलंबून आहे. हल्ली आपण ग्राहक तसे घेण्याबाबत अधिक चोखंदळ झालेलो आहोत. जरी आपल्या मनावर आणि डोळ्यावर, सतत जाहिरातींचा मारा-भडीमार होत असला तरी गुगलप्रमाणे अनेक स्त्रोत आहेत,ज्याद्वारे आपल्याला उत्पादन किंवा सेवा-सुविधांबाबत ताजी माहिती मिळू शकते.सर्वच म्युच्युअल फंडांच्या वेबसाईटस संकेतस्थळ आहेत आणि त्यावर खूप माहिती अगदी दैनंदिन पातळीवर पहायला मिळत असते आणि पारदर्शकता जाणवते. तसेच भन्नाट पसरलेल्या सोशल मीडियामुळे तर अशी ग्राहक-नाराजी तत्काळपणे ‘कमेंट’ उेााशपीीं /ङळज्ञशी रूपात प्रतिबिंबित होत असते आणि एकास ठेच!तर दुसरे अनेक शहाणे होऊ शकतात!! कोणे एकेकाळी ग्राहकांना तितके महत्त्व दिले जात नव्हते. ‘ग्राहक देव आहे!’ अशी सुभाषितवजा वाक्ये हॉटेल किंवा सुबक पाट्याच कपड्यांच्या दुकानातून दिसायच्या, पण पालन तितके नसायचे; पण आता तशी परिस्थिती उरलेली नाही.

सेवा म्हटली की, गैरसोय-त्रुटी या असतातच -कोणत्या प्रकारच्या सामायिक म्हणजे कॉमन तक्रारी असू शकतात?

चुकांचे दोन प्रकार -1 आपल्या हातून झालेल्या – चुकून किंवा काही माहिती देण्याची राहिली असल्याने झालेली त्रुटी

2 म्युच्युअल फंड/एजंटद्वारे झालेल्या चुका-
तसेच आणखीन दोन प्रकार असतात –

1 सर्वसाधारण चुका – अपुरी किंवा चुकीची माहिती देण्यामुळे या घडू शकतात. यांना कारकुनी किंवा प्रशासकीय चुका असेही संबोधले जाते. या चुका चटकन दुरुस्त होण्यासारख्या असतात आणि त्याने लाभांश-पेमेंट अशा बाबतीत परिणाम होण्याची शक्यता नसते.
उदाहरणे – चुकीचा पत्ता किंवा अपुरा पत्ता लिहिणे
खाते क्रमांक पूर्ण न लिहिणे

2 गंभीर चुका – ज्या कारणाने तुमचे थेट आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा स्कीममध्ये नोंदणी न झाल्याने कायमचे नुकसान होण्याची शक्यता असते.
उदाहरणे – अमुक म्युच्युअल फंडाची नवीन योजना 16 तारखेला बंद होणार असेल आणि फॉर्मबरोबर काही माहिती न दिल्याने तुम्हाला त्याचे सभासद होता येत नाही.

1 फॉर्म भरताना केलेल्या काही चुका/उणिवा-आपण विमा उतरवताना किंवा बँकेत खाते उघडताना अनेकदा घाईघाईने त्यात मागितलेली माहिती भरत असतो. अनेकदा कंटाळादेखील करतो! आपण फक्त विचारतो-कुठे सही करायची? तसे आणि तितके आपण बिझी नसतो, परंतु जितके लक्ष घालायला पाहिजे तितके नसतो, ही मात्र वस्तुस्थिती आहे. आपण जिथे आपले घामाचे पैसे गुंतवणार असतो, त्याबाबत नुस्ती माहिती घेऊन उपयोग नाही, तर संपूर्ण तपशील बरोबर आहे की नाही? हे पाहणे गरजेचे असते. अनेकदा आपल्याला काही मध्यस्थ-साहेब, तुम्ही फक्त इथे सही करा!! बाकीचे मी बघतो!! असे सांगतात,तेव्हा आपणही विचार-बिचार न करता बिनधास्तपणे करून टाकतो आणि चेक वा रोकड पैसे देऊन मोकळे होतो.

आपण गाफील न राहता, आपल्याबाबत मागितलेले सर्व तपशील बिनचूकपणे भरले पाहिजेत.कारण आपली माहिती आपल्यापेक्षा अधिक अचूकपणे कोण देवू शकणार? एजंट? मध्यस्थ?

उदाहरणार्थ – आपले नाव -इंग्रजीतील स्पेलिंग.-योग्य असणे हे अतिशय महत्वाचे.कारण दुसरा कोणी वेगळे स्पेलिंग लिहील आणि तुमच्या डॉक्युमेंट्सवर वेगळेच स्पेलिंग असेल,तर नक्कीच गडबड होईल.खुद्द माझ्याच नावाबाबत अनेकदा असे होते. मराठीत ‘राजीव’ लिहिले की, काम सोप्पे होते,पण इंग्रजीत दोन स्पेलिंग होतात1 ठरक्षशर्शीं 2 ठरक्षर्ळीं आणि मग चुकीचे म्हणून चेक परत येतो किंवा फॉर्म स्वीकारलाच जात नाही.

केवळ नावच नव्हे तर घरचा-ऑफिसचा पत्ता, जन्मतारीख, नोकरीबाबतचा तपशील हा नेमका लिहिण्याची सवय ठेवा आणि अधिकृत असेल तोच लिहावा. शिवाय कायमचे घर असल्यास त्याची संपूर्ण माहिती लिहावी. जिथे डॉक्युमेंट्स जोडण्याची गरज असेल तिथे ते न विसरता जोडावेत आणि तसे फॉर्म देताना सांगावे. तसेच फॉर्म संपूर्ण भरून झाल्यावर सही करण्याआधी पुन्हा एक नजर मारा. जनरली आपल्याला सही करण्याची घाई झालेली असते! म्हणून काहीना ‘सह्याजीराव’ असे गंमतीने म्हटले जाते आणि मग द्या. असे केल्याने तुमचा मनस्ताप वाचेल आणि वेळसुद्धा!
रि-डेव्हलपमेंट आणि हंगामी स्थलांतर –

हल्ली बरेचजण रि-डेव्हलपमेंटच्या कारणाने आपली जुनी जागा सोडून भाड्याच्या जागेत स्थलांतर करतात, अशावेळी तात्पुरता पत्ता जरूर लिहावा. नजीकच्या पोस्ट ऑफिसात नक्की कळवावे. शिवाय जिथे आपण आधी गुंतवणूक केली असेल तिथे आणि आपल्या बँकेला कळवावे. म्हणजे तात्पुरत्या निवासाच्या जागी आपल्याला पत्र, लाभांश आणि महत्त्वाची कागदपत्रे योग्यवेळी निश्चितपणे मिळू शकतील. ‘चलता है!’ किंवा ‘नंतर बघू!!’ अशी वृत्ती प्लीज ठेवू नका!!!

2 महत्त्वाचे संदर्भ/डॉक्युमेंटसची माहिती -नंबर-आकडे इत्यादी चुकणे – तुमचा प्यान-कार्डझरप-उरीव किंवा आधार-कार्ड नंबर किंवा अन्य प्रकारची वैयक्तिक किंवा नोकरी-व्यवसायाबाबतची माहिती चुकीची देऊन मोठी गफलत होऊ शकते.म्हणून ती माहिती भरताना तशी डॉक्युमेंट समोर ठेवून जशीच्या तशी लिहावीत. म्हणजे चूक होणार नाही आणि पुढे होणारा गोंधळ निस्तरावा लागणार नाही. आठ आकडी नंबर असेल तर सर्व आकडे लिहिणे ‘मस्ट’ आहे. कारण एकही नंबर जर लिहिला नाही, तर संगणक-प्रणाली तो फॉर्म नाकारते आणि आपला अर्ज निकालात काढला जातो किंवा आपली गुंतवणूक त्या तारखेला नोंदवली जात नाही आणि तीच तारीख समजा अमुक स्किमची शेवटची तारीख असेल तर, तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते.

कोणती खबरदारी घ्याल –

1 फॉर्म भरताना चुका करू नका
2 आपले महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि भरलेला तपशील पडताळून पहा.
3 रकमा, योजना नीट तपासा
4 एकट्याच्या नावे की, अन्य नावांची योग्य माहिती आणि कागदपत्रे द्या
5 चेक दिल्यावर रिसीट मिळाली की, योग्य योजनेतच पैसे गुंतवले गेले आहेत की नाही? हे पहा
6 अनेकदा म्युच्युअल फंडातर्फे लगेच एसेमेस किंवा इ-मेल कन्फर्मेशन येते ते पडताळून पहा आणि काही दुरुस्ती करायची असल्यास लागलीच संबंधितांना कळवा
7 म्युच्युअल फंडातर्फे स्टेटमेंट उ-ड- उेपीेश्रळवरींशव -लर्लेीपीं डींरींशाशपींआले की, तपासून बघा, ते बहुधा प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तयार होते
8 सर्व स्कीम्सचे फ़ोलिओऋेश्रळे नीट लक्षात ठेवा

तक्रार कशी व कुठे कराल –

1 सर्वात प्रथम ज्या म्युच्युअल फंडाबाबत चूक किंवा काही तक्रार असेल, तर थेट त्यांच्याशी लेखी स्वरुपात तक्रार करा

2 बहुतेक म्युच्युअल फंड योजनात तक्रार निवारण कक्ष किंवा विभाग असतो आणि त्यामार्फत तुमच्या तक्रारींचे योग्य निराकरण होऊ शकते.

3 मात्र तसे न झाल्यास किंवा त्यांच्या उत्तराने तुमचे समाधान न झाल्यास तुम्हाला पुढचा पर्याय उपलब्ध असतो.

4 सेबीच्या स्कोअर्स-डएइख उजचझङ-खछढड ठएऊठएडड डधडढएच-डउजठएड-अधिकृत वेबसाईट संकेतस्थळ या ठिकाणी तक्रारीची दाद मागू शकतो.

राजीव जोशी -बँकिंग व अर्थ अभ्यासक

First Published on: October 7, 2018 1:19 AM
Exit mobile version