जागतिक आदिवासी दिन – सांस्कृतिक वारसा जपणारी आदिवासी जमात

जागतिक आदिवासी दिन – सांस्कृतिक वारसा जपणारी आदिवासी जमात

बिरसा मुंडा

मित्रहो, जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने आदिवासींचे दैवत क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ ९ ऑगस्ट हा दिवस राज्यात ‘आदिवासी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निरणय गेतला. जंगलाचे म्हणजेच वनसंपदेचे रक्षण करून पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या कामी वनवासींचे मोठे योगदान आहे. ‘मोडेल पण वाकणार नाही’ हा बाणा त्यांनी पिढ्यान् पिढ्या जपला आहे. हाता-पोटावर काम करून जगणारी ही जमात आहे. त्यांच्याकडे इतर काही उपजिविकेचे साधन नसल्याने ते आर्थिक आणि शैक्षणिक स्तरावर काही प्रमाणात आजही पिछाडीवर असल्याने निदर्शनास येते. जागतिक पातळीवर ही जमात विभिन्न नावांनी ओळखली जाते. या पार्श्वभूमीवर त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास होऊन त्यांचे जीवन सर्व दृष्टीने समृद्ध व्हावे, या उद्देशाने युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेतर्फे ९ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जातो. तमाम आदिवासी बंधू-भगिनींना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

या जमातीचे खरे भाग्यविधाते भगवान बिरसा मुंडा हे होय. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंड राज्यातल्या रांची जिल्ह्याच्या उलिहातु येथे झाला. भगवान बिरसा यांनी शालेय जीवनात महाभारत, रामायण आणि इतर हिंदु धर्मीय ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. आनंद पांड यांना गुरुस्थानी मानून बिरसाने १८९५मध्ये छोटा नागपूर क्षेत्रात इंग्रजांविरूद्ध लढा उभारला. भगवान मुंडा यांचा त्या कालखंडात आदिवासी जनजातींवर एवढा मोठा प्रभाव होता की, त्यांनी आदिवासींचे ख्रिस्ती धर्मांतर थांबवून धर्मांतर केलेल्या आदिवासींना पुन:श्च हिंदु धर्मात समाविष्ट करून घेतले. बिरसा मुंडा हे प्रखर हिंदुत्ववादी होते हे लक्षात येते. क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची १९व्या दशकातले ‘जननायक’ म्हणून जनमानसात ख्याती होती.त्यांनी देशातील सर्व मुंडांना संघटित करून इंग्रज सरकारकडे कर(लगान) माफीसाठी तीव्र आंदोलन केलं. राजद्रोहात्या आरोपाखाली इंग्रज सरकारने ३ मार्च १९९०रोजी चक्रधरपूर येथे बिरसासह अन्य ४६० मुंडांची धरपकड करून त्यांचा अमानुष छळ केला. त्यात बिरसा यांचा ९ जून १९००रोजी रांची येथील कारागृहात मृत्यू झाला. त्यांच्या बलिदानाची भारतीयांना सदैव आठवण रहावी, या उद्देशाने केंद्र सरकारने रांची येथे बिरसा मुंडा केंद्रीय कारागृह आणि बिरसा मुंडा हवाई विमानतळ उभारले. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांचे तैलचित्र संसदेमध्ये लावले आहे.

आदिवासी-वनवासी यांनी केवळ जंगलाचेच रक्षण केलेले नाही, तर त्यांनी रणांगणावरही शौर्य गाजवले आहे. मेवाडचे महाराजा महाराणा प्रताप यांना संकट समयी मदत करून हळदीघाटच्या युद्धात अकबर बादशाहच्या मोगल सैन्याला जेरीस आणून महाराणा प्रतापांना विजय संपादन करण्यात आदिवासी बांधवांनी मोठं पाठबळ दिलं. या कारणास्तव मेवाडच्या राजचिन्हावर राजपूत सैनिक आणि आदिवासी योद्ध्यांचे कोरीव चित्र आहे. म्हणूनच आदिवासींना काटक आणि लढवैय्यी जमात म्हणतात.

राज्यातल्या आदिवासींचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजना राबवून त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी विभिन्न सोयीं-सवलती, शिष्यवृत्त्या दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने राज्यातल्या सुमारे ७ हजार वनवासींना एकूण १० हजार एकर दली जमीनीचे वाटप केले आहे. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायचींना आदिवासी उपाययोजनेंतर्गत ५ टक्के निधी थेट अनुदान म्हणून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. आदिवासी समाजातील मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षण घेणे शक्य व्हावे, म्हणून राज्याने पालकांची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ४.५ लाखांवरून ६ लाख करून दिली आहे. इतका मोठा निर्णय शासन स्तरावर होऊन देखील आजही आदिवासी समाज हलाखीचे जीवन जगत आहे. या समाजाच्या शिक्षित वर्गाने आपल्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील समाज बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय योजना त्यांच्या घरा-घरापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे.

आदिवासींची संस्कृती, चालीरिती, बोलीभाषा या इतर जमातींपेक्षा वेगळ्या असून ही जमात जोपासत असलेल्या संस्कृतीचा आजही सार्थ अभिमान बाळगून आहे. हा समाज एकसंघ असून भलेही इतर जातींपेक्षा तो आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल, पण मनाने निश्चितच श्रीमंत आहे. आदिवासींची वनजमीन तसेच घरकुल, शिक्षण, रोजगार, आरोग्य हे मूलभूत प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारने प्राधान्याने सोडवावेत. म्हणजे हाच खरा वनवासींना आदिवासी दिनानिमित्त दिलेला उपहार ठरेल!

First Published on: August 9, 2019 8:30 AM
Exit mobile version