Makar Sankranti 2024 : 14 की 15 जानेवारी? कधी आहे मकर संक्रांत; जाणून घ्या पुण्यकाळ

Makar Sankranti 2024 : 14 की 15 जानेवारी? कधी आहे मकर संक्रांत; जाणून घ्या पुण्यकाळ

हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचे अधिक महत्व आहे. या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य धनू राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. 2024 मध्ये 15 जानेवारीला संक्रांत साजरी केली जाईल. भारतात हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी मकर संक्रांतीला उत्तरायण देखील म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये संक्रांतीच्या आदल्या दिवशी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी बनवली जाते. तसेच या दिवशी सूर्याची उपासना, स्नान-दानाचे देखील विशेष महत्त्व आहे.

मकर संक्रांत शुभ मुहूर्त

यावर्षी मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी सकाळी 08 : 30 वाजता सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. मकर संक्रांतचा पुण्यकाळ मुहूर्त 15 जानेवारी सकाळी 06 : 50 पासून संध्याकाळ 05: 34 पर्यंत असेल. तर महापुण्यकाळ सकाळी 06 : 50 पासून सकाळी 08 : 38 पर्यंत असेल. पुण्यकाळ आणि महापुण्यकाळामध्ये स्नान-दान करणं शुभ मानले जाते.

मकर संक्रांत करा ‘या’ गोष्टी

 

भगवान श्रीकृष्णांनी सांगितले महत्त्व

ज्योतिषशास्त्रानुसार, भगवान श्रीकृष्णांनी उत्तरायणाचे महत्त्व सांगताना सांगितले होते की, 6 महिन्यांच्या शुभ कालावधीत जेव्हा सूर्यदेव उत्तरायण असतात आणि धरती (पृथ्वी) प्रकाशमय होते, त्यावेळी देह त्याग करणाऱ्या व्यक्तीचा पुनर्जन्म होत नाही. असे लोक थेट ब्रह्माची प्राप्ती करतात, म्हणजेच मोक्ष प्राप्त करतात. यामुळेच भीष्म पितामहांनी देह त्याग करण्यासाठी सूर्य उत्तरायण होईपर्यंत वाट पाहिली.

 


हेही वाचा :

महामृत्युंजय मंत्राचा जप का करावा? वाचा फायदे

First Published on: January 4, 2024 4:16 PM
Exit mobile version