घटस्थापना करताना धान्य का लावतात?

घटस्थापना करताना धान्य का लावतात?

यावर्षी १७ ऑक्टोबरपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होणार आहे. शारदीय नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांचे पूजन केले जाते. शारदीय नवरात्रीमध्ये ‘घटस्थापना’ हा मुख्य विधी असतो. ज्या ठिकाणी घट स्थापन करणार, ती जागा स्वच्छ करुन सारवली जाते. त्यावर मातीचा ओटा तयार केला जातो. त्यावर घटस्थापना करुन त्या घटाखालील मातीत धान्ये पेरली जातात. पण हे का केले जाते हे जाणून घेऊया?

शास्त्रानुसार धान्य हे ब्रह्मदेवाचे रूप मानले जाते. प्राचीन काळी हवन करताना त्याग करण्याची परंपरा होती. त्याच प्रकारे आपणही धान्याचा आदर केला पाहिजे. यावरुन त्याचे महत्त्व दिसते. घटस्थापना करताना धान्य लावले जाते. धान्य भविष्यातील संकेत दर्शवतात. असे मानले जाते की जेव्हा नवरात्रीत धान्याची पेरणी केली जाते आणि जेवढे धान्य वाढते तेवढी देवी आशीर्वाद देते. यावरुन एखाद्याच्या घरातही सुख आणि समृद्धी टिकून असते हे दिसते.

असे म्हणतात की जर धान्याचे अंकुर २ ते ३ दिवसात आले तर ते खूप शुभ आहे. त्याचबरोबर नवरात्रीच्या समाप्तीपर्यंत धान्य वाढत नसेल तर ते चांगले मानले जात नाही. तथापि, बर्‍याच वेळा असे घडते की जरी आपण नीट धान्य पेरले नाही तही धान्य उगवत नाही. याशिवाय, असेही म्हटले जाते की धान्याचा रंग देखील शुभ आणि अशुभवर अवलंबून असतो. जर धान्याचा वरचा अर्धा भाग हिरवा असेल परंतु खालचा भाग पिवळा असेल तर दर्शविते की त्या व्यक्तीचे अर्धे वर्ष चांगले आहे आणि बाकीचे सर्व त्रासांनी भरलेले आहे. त्याच वेळी, जर धांन्याचा रंग पूर्णपणे हिरवा किंवा पांढरा असेल तर हे दर्शविते की त्या व्यक्तीचे संपूर्ण वर्ष खूप चांगले असेल. तसेच, जीवनात अफाट आनंद आणि समृद्धीची चिन्हे आहेत.

 

First Published on: October 16, 2020 12:22 PM
Exit mobile version