Rath Saptami 2021 : उद्या रथ सप्तमी; जाणून घ्या महत्त्व, कथा आणि पूजाविधी

Rath Saptami 2021 : उद्या रथ सप्तमी; जाणून घ्या महत्त्व, कथा आणि पूजाविधी

यंदा रथ स्प्तमी १९ फेब्रुवारी २०२१ या दिवशी येत आहे. दरम्यान या दिवसाला आरोग्य सप्तमी म्हणून देखील ओळखले जाते. तर माघ महिन्यात शुक्ल सप्तमीचा दिवस रथ सप्तमी (Ratha Saptami) किंवा अचला सप्तमी (Achala Saptami) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान सूर्य देवाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. एखादी व्यक्ती आजारी असल्यास ती रोगमुक्त होते, त्याच्या जीवन प्रवासातील अडथळे दूर होऊन त्या व्यक्तीची प्रगती होते.

मकर संक्रांतीपासून सुरू झालेला हळदी कुंकू कार्यक्रमांचा देखील रथ सप्तमी हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी केलेले स्नान, दान, होम आणि पूजा या गोष्टी केल्यास कित्येक पटीने फलदायी ठरतात. रथ सप्तमी ‘अचला सप्तमी’, ‘पुत्र सप्तमी’ आणि ‘आरोग्य सप्तमी’ म्हणूनही ओळखली जाते. जाणून घेऊया या रथ सप्तमी (Ratha Saptami) विषयी…

सप्तमीच्या दिवशाचा मुहूर्त

यंदा रथ सप्तमी शुक्रवार १९ फेब्रुवारी दिवशी साजरी केली जाणार आहे. सप्तमी तिथीची सुरूवात १८ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजून १७ मिनिटांनी होणार आहे तर समाप्ती १९ फेब्रुवारी दिवशी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी होणार आहे. तर या दिवशी स्नानाला विशेष महत्व असल्याने भारतामध्ये काही ठिकाणी रथ सप्तमीच्या दिवशी स्नान करण्याची पद्धत आहे. या करता त्या दिवशी ५.१४ मिनिटं ते ६.५६ हा पहाटेचा वेळ शुभ आहे.

अशी करा पूजाविधी

अशी आहे रथ सप्तमीची कथा

एकदा भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांब याला त्याच्या शारीरिक सामर्थ्यावर गर्व झाला होता. तो सतत सर्वांचा अपमान करत होता. वाईट वागण्यात तो कधीही मागे हटला नाही. एके दिवशी दुर्वासा ऋषी भगवान श्रीकृष्णाला भेटायला आले, तेव्हा ते खूप दुर्बल दिसत होते. त्यांना पाहून, सांब त्यांची चेष्टा करु लागला आणि त्यांचा अपमान करु लागला. सांबच्या या वागण्याने संतप्त झालेल्या दुर्वासा ऋषींनी त्याला, तू कुष्ठरोगी होशील, असा शाप दिला. त्यानंतर सांबची स्थिती पाहून श्रीकृष्णाने त्यांला रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्यास सांगितले. वडिलांच्या आज्ञेचे पालन करून सांबने या दिवशी भगवान सूर्याची पूजा केली. काही काळानंतर तो रोगातून मुक्त झाला. तेव्हापासून रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्याची प्रथा सुरू झाली. असे मानले जाते की, ही उपासना केल्याने कुंडलीतील सूर्याशी संबंधित दोष दूर होतात. व्यक्ती रोगमुक्त होते आणि जीवनात पैशाची, संपत्तीशी आणि मुलांशी संबंधित कोणतीही समस्या येत नाही.

First Published on: February 18, 2021 9:11 AM
Exit mobile version