अंगारकी चतुर्थीला कशी करावी बाप्पाची पूजा; जाणून घ्या शुभ मुहूर्त

अंगारकी चतुर्थीला कशी करावी बाप्पाची पूजा; जाणून घ्या शुभ मुहूर्त

आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. मंगळवारी चतुर्थी तिथी आल्यावर त्याला अंगारकी चतुर्थीचा म्हणतात. ही चतुर्थी भक्तांसाठी शुभ आणि लाभदायी असले अशी भावना आहे. हिंदू परंपरेनुसार चतुर्थी महिन्यातून दोनदा येते. भगवान गणेशाचा जन्म चतुर्थी तिथीला झाला म्हणून ही तिथी गणेशाला समर्पिक आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते, अशी भावना गणेशभक्तांमध्ये असते.

अंगारकी चतुर्थी हे नाव कसं पडलं?
अंगारकी चतुर्थीला गणेशाची विधीवत पुजा- अर्चा, उपवास केला जातो. अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचे फळ मिळते आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असा समज आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे स्वरुप चतुर्मुखी आणि चार हातांचे असते अस समज आहे. गणेशाच्या या रुपाला ‘संकटमोचन गणेश’ असे म्हटले जाते. मंगळदेवाने श्री गणेशाचे तप केले होते त्यावेळी गणेश भगवान प्रसन्न झाले आणि जी चतुर्थी तिथी मंगळवारी येईल, त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखले जाईल, असे वरदान दिले. त्यादिवसापासून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थी तिथीला अंगारकी चतुर्थी म्हणतात.

अंगारकी चतुर्थीचा शुभ मुहूर्त

अंगारकी चतुर्थी प्रारंभ 13 सप्टेंबर सकाळी 10.37 पासून
अंगारकी चतुर्थी समाप्त 14 सप्टेंबर सकाळी 10.23 पर्यंत
चंद्रोदयाची वेळ रात्री 8.52

तसेच अंगारकीच्या दिवशी सकाळी 6.36 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6.05 पर्यंत सर्वार्थसिद्धी योग असेल.

अंगारकी संकष्टी चतुर्थी पूजा विधी

अंगारकी चतुर्थी व्रत करणाऱ्यांनी ब्रह्म मुहूर्तामध्ये स्नान करावे, गणेश मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घ्यावे. यानंतर ॐ गं गणपतये नम:’ मंत्राचा जप करत श्री गणेशाची प्रार्थना करा. एका चौरंगावर स्वच्छ लाल रंगाचं वस्त्र अंथरुण त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवा, यावर गंगाजल शिंपडून संपूर्ण स्थान पवित्र करा, यानंतर फुलांच्या मदतीने गणपतीला जल अर्पण करा, नंतर लाल रंगांचं फूल, दुर्वा, जान्हवं, पानाचा विडा, लवंग, इलायची आणि गुळ, खोबरं ठेवा. त्यानंतर नारळ आणि प्रसादात मोदक अर्पण करा. गणपतीला दक्षिणा अर्पण करून 21 मोदकांचा नैवेद्य दाखवा. सर्व सामग्री अर्पण केल्यावर धूप, दिवा आणि उदबत्तीने गणपतीची विधीत पूजा, आरती करा.

अंगारकी चतुर्थीला करा या मंत्राचे आणि श्र्लोकाचे पठण
या दिवशी बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी श्री गणेश स्तोत्राचे पठण करा. तसेच  ‘ॐ गं गणपतये नम:’  मंत्राचे पठण करा.


हेही वाचा : Vastu Tips : स्वयंपाकघराशी संबंधित पाळा ‘हे’ महत्त्वाचे नियम; देवी अन्नपूर्णा होतील प्रसन्न

First Published on: September 13, 2022 10:06 AM
Exit mobile version