Vat Purnima 2023 : वट पौर्णिमेला विवाहित स्त्रिया वडाला सूत का गुंडाळतात?

Vat Purnima 2023 : वट पौर्णिमेला विवाहित स्त्रिया वडाला सूत का गुंडाळतात?

ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो. वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी विवाहीत महिला आपल्या पतिच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात. यावर्षी हा सण 3 जून रोजी साजरा केला जाईल. वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वट वृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी प्रार्थना केली जाते.

वडाला सूत का गुंडाळतात? 

वटवृक्ष हे शिवाचे रुप आहे. वटवृक्ष हा दिर्घकाळ जगणारा वृक्ष असून या वृक्षापासून भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतं. या वृक्षांवर पक्षांचा वावर असतो. तसेच, अनेक पक्षी घरटी करून आपला संसार थाटतात. पतीला दिर्घायुष्य मिळावं आणि स्थिरतेचं प्रतिक म्हणून वडाला पुजले जाते. पौराणिक कथेनुसार सावित्रीने सत्यवानाचा देह वडाखालीच ठेवला होते.  त्यावेळी वडाप्रमाणेच त्याला दिर्घायुष्य लागो अशी सावित्रीची धारणा होती. वड समृद्धीचं प्रतिक आहे. यामुळेच वडाला सूत गुंडाळून जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना केली जाते.

वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त

पौर्णिमा प्रारंभ : 3 जून रोजी सकाळी 11 वाजून 17 मिनिटांपासून
पौर्णिमा समाप्ती : 4 जून सकाळी 9 वाजून 11 मिनिटांपर्यंत. शनिवार , 3 जून रोजी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जाईल.

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य

1 सूतगंडी, 2 खारीक , 2 बदाम, 10 सुपाऱ्या , 2 खोबरे वाटी , खडीसाखर, गुळाचा खडा, अष्टगंध, अक्षता, हळदी कुंकू, धूप , तूपाचे निरंजन, 25 विड्याची पाने , आंबे, पानवड्यांचा नैवेद्य, यथा शक्ति दक्षिणा, पंचामृत, ताम्हण, कलश, कापूर, फूले-दुर्वा, तूळशीपत्र, पाच फळं.


हेही वाचा : Vat Purnima 2023 : वटपौर्णिमेला ‘या’ रंगाची नेसणं मानलं जातं अशुभ

First Published on: June 1, 2023 2:14 PM
Exit mobile version